आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blast In Fireworks Factory : Woman Killed With One Girl

फटाका कारखान्यात स्फोट : बालिकेसह महिला कामगाराचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - चाळीगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या तळवाडे (पेठ) येथील फटाक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन अकरावर्षीय बालिकेसह महिलेचा मृत्यू झाला. स्फोटाची तीव्रता भीषण असल्याने बालिकेचे अवयव सुमारे तीनशे फूट अंतरावर जाऊन पडले. मंगळवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मीराबाई शिवदास सोनवणे (वय, 33 रा.तळवाडे पेठ) व आरती अरुण सरवणे (वय 11 रा. निंभोरासीम ता.रावेर) अशी मृतांची नावे आहेत तर दीपक पुंडलिक रायभडे हा तरुण किरकोळ जखमी झाला.

कारखाना आवारात कामगारांसाठी चार घरे असून मीराबाई तेथेच राहत होती. मंगळवारी दुपारी सहा कामगार जेवणासाठी घरी गेले होते. पश्चिमेकडील खोलीत मीराबाई सोनवणे व दीपक रायभडे (मृत बालिकेचा मामा) हे नेहमीप्रमाणे फटाके बनविण्याच्या कामात व्यग्र होते. मामाकडे घराची चावी घेण्यासाठी आरती कारखान्यात आली होती. तिला थांबवून मामा लघुशंकेसाठी बाहेर गेला, त्याच वेळी मोठा स्फोट झाला. यात आरतीसह मीराबार्इंचा मृत्यू झाला. मामाला मात्र जीवदान मिळाले.

पावडर गाळताना स्फोट झाल्याचा अंदाज
स्फोट नेमका कशामुळे झाला? याचे ठोस कारण प्रशासनाने सांगितले नाही, मात्र प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. तलाठी एस. टी. महाले यांनी सांगितले की, फटाके बनवण्यासाठी गंधक व गारगोटीची पावडर लागते. लोखंडी चाळणीद्वारे पावडर गाळण्याचे काम सुरू होते. यातील जाड खड्यांचे एकमेकांना घर्षण झाल्याने ठिणगी उडून सुतळी बॉम्बवर पडली. याच बॉम्बचा स्फोट झाल्याने फटाक्याने भरलेल्या बॉक्सने पेट घेतला व स्फोट झाला असावा.