आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी 500 कोटी रुपये खर्चाचे नियोजन तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पंधरवड्याचा अवधी द्या; बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला सुरुवात करू, असे आश्वासन तापी पाटबंधारे महामंडळाने लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय कृती समितीला दिले होते. दरम्यान, हे काम सुरू करण्यासाठी राज्याच्या कॅबिनेटची मंजुरी आवश्यक असल्याचा मुद्दा पुढे आल्याने

लोकप्रतिनिधींची जबाबदारी वाढली आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यासाठी एकूण 650 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी केंद्राकडून विशेष मदत म्हणून 500 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यापूर्वी राज्य सरकारचे पडून असलेले 57 व केंद्राकडून मिळणारे 500 कोटी अशा 557 कोटींमधून मैलाचा टप्पा गाठता येईल; मात्र पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची परवानगी आवश्यक ठरू शकते. कारण मध्यंतरी राज्य सरकारने 25 टक्क्यांपेक्षा कमी कामे झालेले प्रकल्प थांबवले होते. या निकषानुसार बोदवड उपसा सिंचन योजनेला अडचण येऊ शकते. त्यामुळेच पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी राज्य सरकारची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

लिफ्ट पोर्शन टप्पा-1 गरजेचे काम
पहिल्या टप्प्यासाठी केंद्र सरकारकडून 500 कोटी रुपयांचे विशेष साहय़ मिळाल्यास त्यातून 244.44 कोटींच्या जुनोने डॅमसह 272 कोटींची लिफ्ट पोर्शन टप्पा-1 ही कामे प्रस्तावित आहेत. जुनोने डॅमसाठी खोदकाम 46 कोटी आणि 292.55 कोटी तलावाच्या भिंतींच्या संरक्षणात्मक कामां (इबँकमेंट)वर खर्च होईल. लिफ्ट पोर्शन टप्पा-1मध्ये प्रामुख्याने इंटेक स्ट्रक्चर 1.19 कोटी, कनेक्टिंग मेन 6 कोटी, ज्ॉकवेल आणि ओएच पंपहाऊस टप्पा-1-ए 4.71 कोटी, रायझिंग मेन टप्पा-1-ए आणि बी 85.55 कोटी, पंपिंग मशिनरी 70 कोटी, फीडर मेन 6.89 कोटी, सिंचनासाठी मुख्य पाइपलाइन 14.28 कोटी, जुनोने येथे इंटेक स्ट्रक्चर, जुनोने येथे ज्ॉकवेल आणि ओएच पंपहाऊस 6.48 कोटी, जुनोने येथील सिंचनासाठी पंपिंग मशिनरी 17 कोटी, वीज उपकेंद्र आणि वीजतारांसाठी 52.80 कोटी व इतर कामे मिळून 272 कोटी खर्च होतील.

लोकसभेत तारांकित प्रश्न टाकला
राज्य सरकारने 25 टक्क्यांपर्यंत काम झालेल्या प्रकल्पांना थांबवले होते. बोदवड उपसा सिंचनसाठी केंद्राच्या 500 कोटींच्या मदतीतून पहिल्या टप्प्याचे काम सुरू करता येईल; मात्र त्यासाठी राज्य कॅबिनेटला निर्णय घ्यावा लागेल. लोकसभेतही प्रश्न टाकला आहे. हरिभाऊ जावळे, खासदार, रावेर लोकसभा मतदारसंघ

पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटणार
या योजनेच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या तालुक्यांवर निसर्गाची अवकृपा आहे. सिंचन-पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने केंद्र व राज्य सरकारने तांत्रिक अडचणी दूर करून हे काम सुरू करावे. त्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना भेटू. अँड.रवींद्र पाटील, संचालक, पणन महामंडळ, जळगाव

  • योजनेवर एकूण 2,178 कोटी रुपये खर्च अपेक्षित. त्यापैकी केंद्राकडून 500 कोटींचे विशेष साहय़ मिळताच टप्पा 1चे काम.
  • सद्य:स्थितीत टप्पा 1चे काम प्राधान्यक्रमाने सुरू करण्याचा आग्रह. या टप्प्यावर 650 कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता.
  • जमीन संपादन, जुनोने डॅम, लिफ्ट पोर्शन स्टेज 1, जुनोने डॅमवर सिंचनाची व्यवस्था अशी या पहिल्या टप्प्याची विभागणी.


केंद्राच्या मदतीचा ‘हात’ हवा
बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने दिलेले 57 कोटी रुपये पडून आहेत; मात्र केंद्र सरकारने 500 कोटींचे अनुदान दिल्याशिवाय पहिल्या टप्प्याचे पानही हलणार नाही. त्यामुळे या योजनेसाठी केंद्र सरकारच्या मदतीचा ‘हात’ गरजेचा आहे.

22 हजार हेक्टरला लाभ
या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यास एकट्या जुनोने डॅममुळे 120.78 दलघमी जलसाठा होऊन अवर्षणप्रवण तालुक्यांमधील 22 हजार 220 हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. त्यासाठी केंद्राकडून मंजूर विशेष अर्थसाहय़-निधी तातडीने मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करा, या मागणीसाठी सर्वपक्षीय कृती समितीने धरणे आणि बेमुदत उपोषण सुरू केले होते. पालकमंत्री संजय सावकारे व खासदार हरिभाऊ जावळे यांनी आश्वासन दिल्याने समितीने उपोषण मागे घेतले. या वेळी पंधरवड्यात काम सुरू करू, असा शब्द देणार्‍या तापी पाटबंधारे महामंडळाची आता खर्‍या अर्थाने सत्त्वपरीक्षा सुरू झाली आहे.

दोन वर्षांमध्ये गरज
02013-14मध्ये हवेत 118.03 कोटी
02014-15मध्ये 126.41 कोटींची मागणी

500 कोटी रुपये खर्चाचे नियोजन तयार

8.80 कोटी, जमीन संपादन खर्च
244 कोटी, जुनोने डॅमवरील खर्च
272 कोटी, लिफ्ट पोर्शन स्टेज 1
55 कोटी, धरणाची सिंचनप्रणाली
580 कोटी, पहिल्या टप्प्याचा खर्च
70 कोटी, रकमेची दरवाढ शक्य
650 कोटी, एकूण खर्च रक्कम
550 कोटी, उपलब्ध होणारा निधी
जुनोने डॅम 120.78 दलघमी