आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोदवड उपसा सिंचन; दाेन हजार काेटी मंजूर, रखडलेला प्रकल्प मार्गी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/जळगाव : जळगाव अाणि बुलडाणा जिल्ह्यातील ५३,४४९ हेक्टर क्षेत्रासाठी संजीवनी ठरणाऱ्या बाेदवड परिसर उपसा सिंचन याेजनेच्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता देऊन नवीन वर्षात सुखद धक्का दिला अाहे.
 
तब्बल हजार १७८. ६७ काेटी रुपयांच्या या प्रकल्पात जळगाव जिल्ह्यातील ३३,६६८ हेक्टर अाणि बुलडाणा जिल्ह्यातील १९,७८१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ हाेणार अाहे. सन २०११मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले हाेते. मंगळवारी मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे या वर्षात याेजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम प्रत्यक्ष सुरू हाेणार आहे. 
 
बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेचे काम दाेन टप्प्यांमध्ये नियाेजित अाहे. त्यात पहिल्या टप्प्यातील पंपगृह अ, पंपगृह ब, जुनोने साठवण तलावाचे ३०१.०० मी. तलावापर्यंतचे काम उद्धरण नलिकेची एक रांग ही कामे पूर्ण करून १४,९९४ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण केली जाणार अाहे.
 
सिंचनाच्या श्वेतपत्रिकेनंतर राज्यपालांनी राज्यात नवीन प्रकल्प हाती घेता ७५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालेल्या प्रकल्पांना प्राधान्य देण्याची शिफारस केली हाेती. त्यामुळे बोदवड उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी केंद्र शासनाकडून प्राप्त अर्थसहाय्य निधी राज्यपालांच्या सूत्राबाहेर ठेवण्यासाठी राज्यपालांना शिफारस करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
 
या प्रकल्पाला केंद्र शासनाकडून सन २०१२ मध्ये एकरकमी ५०० कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर झाले आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १४,९९४ हेक्टर दुसऱ्या टप्प्यात ३८,४५५ हेक्टर जमिनीवर सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यात जिल्ह्यातील बोदवड, जामनेर आणि मुक्ताईनगर तालुक्याला लाभ होणार आहे. 
 
अशी असेल याेजना 
मुक्ताईनगरजवळ तापीचे बॅकवाॅटर असलेल्या पूर्णा नदीच्या काठी खामखेडा येथे इंटेक चॅनल जॅकवेल बांधले जाईल. जॅकवेलमधून पाणी उपसा करून जॅकवेलपासून २५०० मिमीच्या दाेन पाइपलाइनद्वारे पहिल्या टप्प्यात जुनाेने येथे साठवण तलावात पाणी साेडले जाईल.
 
दुसऱ्या टप्प्यात १८५० मिमी व्यासाच्या पाइपलाइनद्वारे जामठी येथे साठवण बंधाऱ्यात पाणी साेडले जाईल. दाेन्ही ठिकाणी मातीचे साठवण बंधारे बांधणे प्रस्तावित अाहे. साठवण बंधाऱ्यांमधून जळगाव जिल्ह्यातील ६३ टक्के, तर बुलडाणा जिल्ह्यातील ३७ टक्के क्षेत्र सिंचनाखाली येईल. बंधाऱ्यांमधून बंद पाइपलाइनद्वारे शेतापर्यंत पाणी वितरित होणार अाहे. 
 
वर्षांत पूर्ण करणार 
- बाेदवड उपसासिंचन याेजनेच्या मान्यतेने प्रकल्पाचे काम मार्गी लागले अाहे.
पहिल्या टप्प्यासाठी ७५० काेटी रुपये तत्काळ उपलब्ध करून देणार अाहाेत. दाेन वर्षात प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार अाहाेत. शेळगाव बॅरेज, वरखेडे लाेंढे, वाघूर, अक्कडपाडा हे प्रकल्प लवकर पूर्ण करणार अाहाेत. तत्काळ निधी देऊ. 
-गिरीशमहाजन, जलसंपदा मंत्री 
बातम्या आणखी आहेत...