आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव- मेहरूण तलाव परिसरातील जंगलात गुरुवारी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृतदेहाच्या अवस्थेवरून प्रथमदर्शनी खुनाचा संयश व्यक्त केला जात आहे. शेतात रखवाली करणारा ठेंगेवाला गुरुवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास मेहरूण परिसरात गस्त घालत असताना त्याला एक मृतदेह आढळून आला होता. याबाबत त्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात माहिती दिली. काही वेळेतच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तलावाच्या दक्षिणेस दोन किलोमीटर आत पडीक शेतात एक मृतदेह पडला होता. विशेष म्हणजे मृतदेहाचे दोन्ही पाय आणि हात आढळून आलेले नाहीत. तसेच एका पायाचे हाड कुत्र्यांनी परिसरातच पळविले होते. पोलिसांनी संपूर्ण परिसर पिंजून काढला. त्यात डोक्याचे केस आणि तीन हाडे मिळून आली. मृतदेहाच्या डोक्यावर एकही केस शिल्लक नव्हता. घटना होऊन आठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह आढळून आलेले शेत जंगलाच्या परिसरात आहे. तो परिसर निर्मनुष्य आहे. त्यामुळे खुनाचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मृताची ओळख पटविणे कठीण
मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब आहे. डोक्यावर केस आणि चेहर्यावर मास शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे चेहर्याने ओळखणे शक्य नाही. दोन्ही हात आणि पाय गायब आहेत. कवटी आणि गळ्याभोवती शर्ट आणि बनियान आवळलेला आहे. त्यामुळे गळा दाबून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहापासून 50 ते 60 मीटर अंतरावर जीन्स पॅण्ट आणि बुट आढळून आले आहेत.
पोलिसांनी नमुने घेतले
मृतदेहाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावर आढळून आलेले रक्ताचे डाग, मृतदेहाजवळ असलेले केस, माती आदींचे नमुने घेतले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. त्यामुळे शवविच्छेदनाचा अहवाल आणि नमुन्याच्या अहवालावरूनच हा खून की अपघात? याबाबत माहिती कळेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.