आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरी-खोऱ्यांतील मृतदेह काढणे, जखमींना मदतीची सेवा; 12 गिर्यारोहक विनामोबदला करतात काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- डोंगराळ भागात पर्यटनासाठी आलेल्या नागरिकांना संकट काळात स्वत:चा जीव धोक्यात घालून मदत करण्याचे काम पुणे येथील डिझास्टर मॅनेजमेंट (डीएमएफ) या संस्थेतील १२ गिर्यारोहक करत आहेत.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गिर्यारोहण करताना दरी-खोऱ्यामध्ये अडकून पडलेल्यांना बाहेर काढणे, जखमींना मदत, मृतदेह बाहेर काढणे, अशी साहसी कामे डीएमएफचे गिर्यारोहक करत आहेत. आपत्ती व्यवस्थापनातही या टीमचा सहभाग असतो.  यामध्ये जळगावचा मितेश रमेश मोमाया हा तरुणही चार वर्षांपासून सेवा बजावत आहे. विशेष म्हणजे विनामोबदला ते हे काम करत आहेत.
  
पुण्यात २०१३ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. पुणे शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगराळ भाग आहे. तेथे वर्षाकाठी हजारो लोक पर्यटनासाठी येतात. यात बऱ्याच वेळा अपघात होत असतात. दरी-खोऱ्यांमध्ये पडल्यानंतर बाहेर येणे कठीण असते. बऱ्याच वेळा पडणाऱ्याचा  जागीच मृत्यूदेखील होतो. अत्यंत खोल दऱ्यांमध्ये मृतदेहदेखील दिसत नाही. हे मृतदेह किंवा जखमींना शोधण्यासाठी पोलिस, अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनाही मर्यादा येतात. त्या वेळी डीएमएफ या संस्थेचे गिर्याराेहक त्या भागात जाऊन जखमींना अथवा मृतदेह बाहेर काढण्याचे काम करत आहेत. अलीकडे सेल्फी काढण्याच्या नादात दरीत पडून अपघात होण्याचे वाढले आहेत. अशा वेळी या गिर्यारोहकांच्या मदतीचा हात उपयोगी ठरत आहे.
 
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा या गिर्यारोहकाविषयी सविस्तर माहिती...
 
बातम्या आणखी आहेत...