आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिचडीला बोगस फोडणी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या व हजेरीतील गौडबंगाल समोर येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणारे माध्यान्ह भोजनही (खिचडी) संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहे. विद्यार्थी हजेरीच बोगस आढळून येत असल्या संदर्भात सखोल चौकशी केल्यास तांदूळ वाटपातील घोळ समोर येऊ शकतो.

पालिकेच्या शाळेत शिकणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन योजनेचा लाभ मिळतो. 33 शाळांमधील पटावरील विद्यार्थीसंख्येच्या हिशेबानुसार दर महिन्याला सरासरी केवळ 55 ते 60 टक्के विद्यार्थीच हजर असतात. शिक्षण मंडळ सभापती व सदस्यांकडून केलेल्या पाहणीत हजेरीत मोठी तफावत उघड झाली आहे. पोषण आहारासाठी असलेले रजिस्टरही अद्ययावत करण्यात येत नाही. विद्यार्थी हजेरीतच तफावत असून बर्‍याच शाळेत मोठय़ा प्रमाणात तांदळाच्या गोण्या पडून आहे. याप्रकरणी खोलात जाऊन चौकशी केल्यास तांदूळवाटपातील घोळ समोर येईल.

असे होते तांदूळवाटप
0 पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यास एका दिवसासाठी 100 ग्रॅम तांदळाचा आहार दिला जातो. महिन्याला एकूण 2 किलो 300 ग्रॅम तांदूळ देण्याचे शासनाचे धोरण आहे.

0 सहावी ते सातवीच्या विद्यार्थ्यास एका दिवसाला 150 ग्रॅम तर महिन्याला एकूण 3 किलो 450 ग्रॅम तांदूळ देण्याचे शासकीय धोरण आहे.

महिन्याला लागतो 123 क्विंटल तांदूळ
पालिकेच्या 33 शाळांमध्ये एकूण सप्टेंबर 2012 च्या गणनेनुसार 7 हजार 579 विद्यार्थी पटसंख्या आहे. सर्व विद्यार्थी पटसंख्येनुसार हजर राहिल्यास दर महिन्याला 123 क्विंटल 14 किलो तांदूळ मिळणे अपेक्षित आहे. असे असले तरी ऑगस्ट 2013 महिन्यातील तांदूळ मागणी 43.34 क्विंटल, सप्टेंबरमध्ये 55.98 क्विंटल तर ऑक्टोबर महिन्यातील तांदूळ मागणी 71. 53 क्विंटल नोंदविण्यात आली आहे. दर महिन्याला सरासरी किमान 60 टक्के विद्यार्थीच हजर राहत असल्याचे उघड होते. 40 टक्के विद्यार्थी सतत गैरहजर राहतात की ते विद्यार्थीच अस्तित्वात नाही असा प्रo्न उपस्थित केला जात आहे.

विद्यार्थी हजेरीत तफावत
शाळा पाहणीदरम्यान विद्यार्थी पटसंख्या, दाखवलेली हजेरी व प्रत्यक्षात हजर असलेले विद्यार्थी यात तफावत असल्याचे निदर्शनास आली होती. पोषण आहाराच्या नोंदीही अद्ययावत नव्हत्या. वरिष्ठ अधिकार्‍यांनी चौकशी केल्यास यातून बरेच प्रकार उघडकीस येतील विजय वाणी, सभापती, शिक्षण मंडळआकडेवारी जुळणार नाही
जादा विद्यार्थी हजर दाखवल्यास तेवढे तांदूळ वापरल्याचे दाखवावे लागते. शाळांमध्ये शिल्लक साठय़ाची आणि पोषण आहार रजिस्टर नोंदीत तफावती आहेत. अचानकपणे तपासणी केल्यास खर्ची व शिल्लक तांदळाची आकडेवारी जुळणार नाही, यातून यातील गौडबंगाल समोर येईल. हरीश आटोळे, सदस्य, शिक्षण मंडळ