आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्कापासून वंचित: बोगस मतदारांनी लावला अधिकार्‍यांना चुना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- विजयश्री खेचून आणण्यासाठी वाट्टेल ते करण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रातील अधिकार्‍यांच्या डोळ्यात धूळफेक करीत बोगस मतदान घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. मतदानासाठी गेलेल्या मतदारांना आपल्या नावावर यापूर्वीच मतदान झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा भंडाफोड झाला. याबाबत मात्र मतदान अधिकार्‍यांकडून कोणत्याही चुका झाल्या नसून पुराव्यानुसारच मतदान झाल्याचा दावा केला जात आहे. शहरात असे प्रकार बºयाच ठिकाणी झाल्याने खºया मतदारांना मात्र मतदानाच्या हक्काला मुकावे लागले आहे.
खोटेनगर परिसरातील शाळेत मतदानासाठी गेलेल्या महिला मतदारांना ‘तुमचे मतदान यापूर्वीच झाले आहे’ याकारणावरून मतदानापासून वंचित ठेवल्याचा प्रकार दुपारी घडला. दुबार मतदानाचा अधिकार असतानाही तासभर ताटकळत ठेवल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. प्रशासनाच्या या असहकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. महापालिका निवडणुकीसाठी रविवारी पार पडलेल्या मतदानादरम्यान मतदार यादीतील चुकांचा फटका मतदारांना सोसावा लागला. प्रभाग क्रमांक 12 मधील उत्कर्ष विद्यालयातील मतदान कें द्रात दुपारी मतदानासाठी येणाºया बºयाच मतदारांना त्यांच्या नावावर कोणीतरी मतदान करून गेल्याचे निदर्शनास आले. मतदानासाठी गेलेल्या या मतदारांना तुमचे मतदान यापूर्वीच पार पडल्याचे सांगण्यात आले. परंतु आम्ही मतदानासाठी आताच आल्याचा दावा करून मतदानाची शाईसुद्धा नसल्याचे मतदारांनी सांगितल्यावरदेखील त्यांना मतदानाचा अधिकार गाजवता आला नाही. त्यामुळे या मतदान केंद्रावर दुसºयाच्या नावावर मतदान करून आपली राजकीय पोळी भाजणार्‍यांची टोळी सक्रिय असल्याचा आरोप
मतदानापासून वंचित राहिलेल्या मतदारांनी केला.

हे आहेत वंचित मतदार
प्रभाग क्रमांक 12 मध्ये संदीप दिनकर पाटील, शकुंतला शांताराम पाटील, चित्राबाई सुरेश पाटील, ज्योती संजय पाटील या मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

ही दिली कारणे
मतदारांना मतदान झाल्याचे सांगितल्यानंतर आपली ओळख पटवून देत दुबार मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून आग्रह धरण्यात आला; परंतु ओळखपत्रावरील फोटो मॅच होत नाही. तुम्ही दुसरे ओळखपत्र आणा यासारख्या अटी घातल्या. त्यामुळे पुन्हा घरी जाऊन मतदानासाठी येण्याचे टाळले.

मतदानादरम्यान फसवणुकीची तक्रार
प्रभाग 12 मधील उत्कर्ष विद्यालयात मतदानासाठी आलेल्या वैशाली विजय पाटील यांना मतदान अधिकार्‍यांनी लाल बटण दाबण्याचा सल्ला दिला. ते बटण दाबल्याशिवाय मशीन सुरू होणार नसल्याचे कारण दिले. मात्र लाल बटण दाबल्यानंतर चिन्हासमोरील बटण दाबण्यास नकार देण्यात आला. माझे मतदान होऊ न देता चुकीचे मार्गदर्शन करून माझी फसवणूक झाल्याची तक्रार यावेळी केली. यासंदर्भात केंद्रप्रमुख नामदेव बोरसे यांना विचारणा केली असता पुरावे तपासून मतदानाची परवानगी दिली जाते. बºयाच मतदारांचे फोटो मॅच होऊ शकले नाही. पुरेसे पुरावेही आणले नाहीत. दुबार मतदानासाठी पुरावे आणण्यास असमर्थता दाखवल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही असे सांगितले.