आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मगुरुंच्‍या अंत्यदर्शसाठी;बोहरा व्यापारी मुंबईत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- बोहरी समाजाचे धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुर्‍हानुद्दीन (आर.ए.) यांचे वयाच्या 102 व्या वर्षी शुक्रवारी मुंबईत निधन झाले. त्यांच्या अंतिम दर्शनास जळगाव शहर व जिल्हाभरातून सुमारे 400 बोहरा समाज बांधव रवाना झाले आहेत. धर्मगुरूंच्या निधनामुळे बोहरा समाज 3 दिवस आपला व्यवसाय बंद ठेवणार आहे.

धर्मगुरूंचे निधन झाल्याचे वृत्त कळताच शहरातील बोहरा समाजातील व्यापार्‍यांनी आपली दुकाने बंद करून मुंबईकडे रवाना झाले. आपल्या कारकिर्दीत धर्मगुरू डॉ. सय्यदना मोहम्मद बुर्‍हानुद्दीन यांनी देशभरात विविध ठिकाणी 700 बोहरा समाजाच्या नवीन मशिद उभारल्या तर 52 दर्गांचे नूतनीकरण केले आहे. जळगावातील 35 कुटंबांना त्यांनी विनामूल्य घरांचे वाटप केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याशेजारील सैफी मेहेल येथून शुक्रवारी रात्री 11.52 वाजता धर्मगुरूंची अंत्ययात्रा निघणार होती. शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत भेंडीबाजार परिसरात त्यांचा दफनविधी होणार असल्याचे व्यापारी युसूफ मकरा यांनी सांगितले.