आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक नमाज पठणासह बोहरा समाजाची सोमवारी ईद साजरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव-बोहरा समाजातर्फे सोमवारी रजमान ईद साजरी करण्यात आली. सामूहिक नमाज पठणासह ईदच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वाच्या एक दिवस अगोदर बोहरा समाजाच्या रमजानला प्रारंभ झाला. त्यानुसार रविवारी 30 रोजे पूर्ण होऊन सोमवारी ईद साजरी करण्यात आली. सकाळी 6 वाजता बोहरा मशिदीत मुंबईचे अब्देमनाफभाई यांच्या उपस्थितीत नमाज पठण करण्यात आली. त्यानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळी लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमही झाले. यात मुलांसाठी तोडी कुराण वाचन स्पर्धा झाली. यात इनेशिया बाला हिने प्रथम क्रमांक मिळवला. आमीर लेहरी व अजिज काटावाला यांना द्वितीय क्रमांक आला. 150 नमाज, 30 दिवस उपवास, 30 दिवस कुराण पठण करणार्‍या 60 जणांना बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. यात प्रथम बक्षीस युसूफ मकरा यांना मिळाले. या वेळी गुलाम लेहरी, शेख मोहिज आरसीवाला, मोहंमद हुसेन लेहरी, इसमाईल ईज्जी, कायमभाई मास्टर, सैफुद्दीन अमरेलीवाला, अब्दुल कादीर भावनगरवाला, शब्बीर बदामी यांच्यासह 800 बोहरा समाजबांधव उपस्थित होते.