आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - वाशीम येथून चोरलेल्या बोलेरोचा नंबर बदलवून पलायन करणार्या दोघा भामट्यांना संशयावरून मंगळवारी इच्छादेवी चौकात पकडण्यात यश आले. लघवीच्या निमित्ताने पळ काढणार्या एकास रिक्षाचालकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ताब्यात घेतल्यानंतर या चोरीच्या घटनेचा उलगडा झाला.
वाशीम येथून पांढर्या रंगाची बोलेरो चोरीस गेल्याची माहिती जळगाव पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार बाहेरगावाच्या वाहनांवर वाहतूक शाखेचे पोलिस नजर ठेवून होते. मंगळवारी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या सुमारास एक पांढर्या रंगाची बोलेरो कार इच्छादेवी चौकात येताना वाहतूक पोलिस विजय इंगळे यांनी पाहिले. त्या बोलेरोवर एमएच-31/एडी-2457 असा नंबर होता; मात्र या वाहनाचा खरा क्र मांक एमएच-37/जी-1257 असा आहे.
इच्छादेवी चौकात नेमणुकीला असलेल्या इंगळेंचा संशय बळावल्याने त्यांनी संबंधित बोलेरो गाडी थांबवून चौकशी केल्यावर कागदपत्रे बनावट असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे इंगळे यांनी ताबडतोब जिल्हापेठ पोलिसांशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. याप्रकरणी बोलेरो गाडी पळवणारे प्रकाश भटुजी पवनीकर (रा. नागपूर) व विनोद शंकरराव गिरे (रा. मूर्तिजापूर) यांना ताब्यात घेण्यात आले असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. संबंधित वाहनाचे मूळ मालक जळगावकडे रवाना झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
रिक्षाचालकांनी केला संशयिताचा पाठलाग
बोलेरो वाहनाची तपासणी सुरू असताना जवळच भरत वाघ, सुनील वाणी, संजय जोशी, अनिल चौधरी व रवींद्र सोनवणे हे रिक्षाचालक नाश्ता करत होते. कागदपत्रांवरून पोलिसांना चोरीची बोलेरो असल्याचा संशय आल्याचे या रिक्षाचालकांच्या लक्षात आले. दरम्यान, दोघांपैकी एक जण गणपतीनगरकडे पळून जाण्याच्या प्रय}ात होता; मात्र या रिक्षाचालकांनी पाठलाग करत त्याला गणपती मंदिराजवळ पकडले. पळून जाण्याचे कारण काय याबाबत चौकशी केली असता ती बोलेरो चोरीची असल्याचा उलगडा झाला.
ताब्यात घेतलेल्या बोलेरो वाहनाचे स्विच काढले होते. तसेच चावीही नव्हती. तपासणीदरम्यान वाहनात आरटीओचे शिक्के सापडले. त्यासोबत रेडियम, नंबरप्लेटचे खिळे, कात्री व रेडियम कापण्याचे कटरही मिळून आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.