आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bomb Blast At Channai, And Inhibition At Bhusawal, Divya Marahti

बॉम्बस्फोट चेन्नईत, दक्षता भुसावळात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - चेन्नई-गुवाहाटी एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी बॉम्बस्फोटाची खबर मिळताच भुसावळ जंक्शनसह विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर बंदोबस्त वाढवण्यात आला. काही गाड्यांची श्वान पथकाद्वारे कसून तपासणी करण्यात आली.

चेन्नईमध्ये बॉम्बस्फोट झाल्याने देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर हाय-अलर्ट जारी करण्यात आला. नियमित बंदोबस्तासह साध्या वेशातील पोलिसांची पथके नियुक्त करण्यात आली. भुसावळ विभागात रेल्वे सुरक्षा बलाने विशेष सतर्कता घेत श्वान पथकाद्वारे स्थानक परिसर, पार्सल विभाग, प्रतीक्षालय, धावत्या गाडीच्या जनरल-एसी डब्यांमध्ये तपासणी केली. आरपीएफ निरीक्षक अजय यादव, लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक के. एस. पुजारी, सहायक निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह सुरक्षा यंत्रणेचा ताफा रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आला. स्थानकात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाजवळील साहित्याची, लगेज स्कॅनर मशीनमध्ये तपासणी होत आहे.