आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगड समजून गावठी बाॅम्ब धरला हातात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मुक्ताईनगर तालुक्यातील कु-हा काकाेडा शिवारात शनिवारी गुराख्याने दगड समजून गावठी बाॅम्ब हातात धरला. त्या बाॅम्बचा हातातच स्फाेट झाल्याने वृद्ध गुराखी गंभीर जखमी झाला अाहे. रानडुकरांच्या शिकारीसाठी हा बाॅम्ब ठेवला हाेता.
कु-हा काकाेडा येथील पंढरी मन्साराम हिराेळे (वय ६०) हे नेहमी प्रमाणे शनिवारी गावातील गुरे पूर्णा नदीच्या काठावर चारण्यासाठी घेऊन गेले हाेते. दुपारी ते जेवणासाठी बसले. त्या वेळी त्यांनी गुरे हाकलण्यासाठी बाजूला पडलेला दगडासारखी दिसणारी वस्तू हातात घेतली. तिचा स्फाेट झाल्याने ते गंभीर जखमी झाले.

शिकारी सक्रिय
वढाेद्याच्याजंगलात चार दिवसांपूर्वी एक वाघिण मृत अवस्थेत अाढळली हाेती. त्याला लागूनच असलेल्या कु-हा काकाेडा परिसरात शिकारीसाठी ठेवलेल्या गावठी बाॅम्बचा स्फाेट झाला. यामुळे या जंगलात शिकारी सक्रिय असल्याचे समाेर अाले अाहे.