आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देश सेंट्रलमध्ये ‘बॉम्बा’बोंब, विद्यार्थ्यांच्या विसरण्‍याने २० मिनिटे हायटेन्शन ड्रामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खान्देश सेंट्रल मॉलमध्ये दुसऱ्या मजल्यावर मंगळवारी दुपारी वाजेच्या सुमारास बेवारस बॅगमुळे गोंधळ उडाला. बॉम्बच्या शंकेने उपस्थितांच्या उरात धडकी भरली. अखेर या बॅगेची बॉम्बशोधक पथकाने २० मिनिटे तपासणी केली. बॅगमध्ये बॉम्ब नसल्याचे निष्पन्न होताच उपस्थितांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. ही बॅग मूळचा भडगाव हल्ली पुण्यात डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या निखिल पर्वत देवरे त्याच्या मित्रांची होती. खरेदी केल्यानंतर ते बॅग मॉलमध्येच विसरले होते.

बॉम्बशोधक पथकातील अधिकारी बॅगची तपासणी करताना. समोर श्वास रोखून पाहणारे मॉलमधील ग्राहक कर्मचारी.

इअर फोनमुळे संशय वाढला...
बॉम्बशोधकनाशक पथक (बीडीडी
एस)पथकातील प्रदीप बडगुजर, अरुण पाटील, राजेंद्र महाजन, सुनील बडगुजर, नंदलाल चौधरी, अनिल डोळे, शरद पाटील, रेवानंद साळुंखे, जुबेर शेख आणि राजेंद्र पाटील यांनी तीन प्रकारच्या चाचण्या करून बॅगेत काय असेल, याबाबत खात्री केली. बॅगेत एक खोका, आयकार्ड आणि मोबाइलचे इअर फोन एक केबल असल्याचे निष्पन्न होत होते. त्यामुळे भीती अधिकच वाढत होती. कारण अनेकदा बॉम्बमध्ये केबलचा वापर केला जातो. त्यामुळे संशय वाढल्याने पथकाने पुन्हा तपासणी केली.