आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bombard Of Questions Of BJP Workers On Municipal Commissioner

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप पदाधिकाऱ्यांचे आरोप; आयुक्त संतप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील साफसफाईसह विकास कामांच्या मुद्यांवर चर्चेसाठी गेलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती केली. गाळेधारकांसाेबत उंदिर-मांजराचा खेळं करतायं, जळगाव कोणत्या पातळीवर नेऊन ठेवले? असा आरोप होताच आयुक्त संजय कापडणीस यांचा संताप झाला. ‘अत्यंत वाईट परिस्थितीत मी कसा काम करतोय हे खुर्चीवर बसल्यावर कळेल, केवळ उचलली जीभ आणि लावली टाळुला, असे करू नका’, असा सल्लाही आयुक्तांनी आमदार सुरेश भोळेंच्या समक्ष भाजप कार्यकर्त्यांना दिला.
जळगाव महापालिकेतर्फे गेल्या काही वर्षांपासून नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याकडे दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात भाजपकडून मोर्चे निवेदन तसेच उपोषण करून जागे करण्याचे काम वेळोवेळी केले होते. मात्र, प्रशासनाने ते गांभीर्याने घेतले नाही. म्हणून आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नगरसेवक वेगवेगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांनी दुपारी वाजता महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेतली. या वेळी तीन पानी निवेदन देऊन १८ मुद्द्यांवर चर्चा झाली.