आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळातही आयपीएल सट्टेबाजार तेजीत, २५ दिवसांत २० कोटींची उलाढाल!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एकीकडे दुष्काळामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट पसरले अाहे, तर दुसरीकडे अायपीएलच्या सट्टे बाजारात तेजी सुरू अाहे. अातापर्यंत झालेल्या ३२ सामन्यांवर शहरातून माेठ्याप्रमाणात सट्टा लावण्यात अाला आहे. सट्टा लावणाऱ्यांमध्ये व्यापाऱ्यांपेक्षा महाविद्यालयीन विद्यार्थीच अाघाडीवर अाहेत. शहरात २५ दिवसांत सुमारे २० काेटींची उलाढाल झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

चाेपडा,भुसावळात माेठे केंद्र
सट्टाबेटिंगचे जिल्ह्यातील नव्हे, तर राज्यातील सर्वांत माेठे केंद्र चाेपडा भुसावळ येथे अाहे. सट्ट्याची बोली ऑनलाइन पद्धतीने चालत असून नागपूर, इंदूर, सुरत, जालना, भुसावळ, औरंगाबाद, अहमदनगर, दिल्ली येथून मुख्य बुकी बोली लावतात. शहरातसुद्धा अनेक ठिकाणी बुकींची माणसे कार्यरत असून मोबाइलद्वारे ते पैसे लावणाऱ्यांची बोली घेत आहेत. अार्थिक व्यवहार हा हवालाच्या मार्गाने होतो. शहरातील काही भागांतील लॉटरी सेंटरमधून पैशांची देवाण-घेवाण होते. विशेष म्हणजे ‘बेट फेअर’ नावाच्या अधिकृत संकेतस्थळावरून फुटबॉल, रेसिंग, कसिनो यासह आयपीएल सट्ट्याचे दैनंदिन भाव प्रदर्शित होत आहेत. त्यावरून माहिती मिळताच सटोडिये बोली लावत आहेत.

शहरात येथे घेतला जाताे सट्टा
शहरातरेल्वेस्थानक परिसर, रामानंदनगर, कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ, तसेच काही उच्चभ्रू वस्त्यांमध्येही सट्टा घेतला जात अाहे. मात्र, सटाेडिये दरराेज जागा बदलत असल्यामुळे त्यांच्यावर संशय येत नाही. याच कारणामुळे पोलिसांनाही त्यांना शोधणे कठीण होते. दीड वर्षांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील उच्चभ्रू भागातून विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडले होते. मात्र, तेव्हाही पोलिस मूळ बुकीपर्यंत पोहोचले नव्हते, आताही तशीच परिस्थिती आहे.

...असा चालतो व्यवहार? : मागील वर्षी शहरात नऊ बुकींना अटक झाली होती. त्यानंतर सट्टा बंद हाेईल, असा अंदाज लावला जात हाेता. पण ताे फाेल ठरला अाहे. यंदा अायपीएलच्या सामन्यावर हजारपासून लाखापर्यंत बोली लावली जात आहे. नव्याने सट्टा लावणाऱ्या व्यक्तीकडून डिपॉझिटची रक्कम घेतली जाते. नव्या लोकांसोबत रोजच्या रोज व्यवहार केला जातो, तर नेहमीच्या लोकांसोबत सोमवार ते सोमवार कलेक्शन केले जाते. आतापर्यंत ३२ सामने झाले असून २९ मे रोजी शेवटचा होणार सामना आहे. काही ठिकाणी गुंडांमार्फत हे पैसे वसूल केले जाण्याच्या घटना घडल्या अाहेत.
बातम्या आणखी आहेत...