आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव मनपाच्या अायुक्तपदी बाेर्डे, उपायुक्तपदी फातले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या२८वे अायुक्तपदी किशोेर बाेर्डे यांची, तर उपायुक्तपदी राजेंद्र फातले यांची नियुक्ती करण्यात अाली अाहे. दाेघेही मालेगाव महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी अाहेत. विद्यमान अायुक्त संजय कापडणीस यांची पदस्थापना झालेली नाही. उपायुक्त प्रदीप जगताप यांची अचलपूर (जि. अमरावती) येथे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली करण्यात अाली अाहे.

कापडणीस यांच्या जागी मालेगाव महापालिकेचे अायुक्त म्हणून काम पाहिलेले किशाेर बाेर्डे यांची नियुक्ती झाली अाहे. बाेर्डे हे मेपासून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत हाेते. त्यांच्या साेबत मालेगाव पालिकेतील उपायुक्त राजेंद्र फातले यांचीही जळगावला नियुक्ती करण्यात अाली अाहे. तर गेल्या काही महिन्यांपासून दाेन उपायुक्तांची जबाबदारी पार पाडणारे जळगावचे उपायुक्त प्रदीप जगताप यांची अचलपूर (जि.अमरावती) येथील ‘अ’ वर्ग नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली झाली अाहे. गेल्या दीड महिन्यापासून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेले नवनियुक्त अायुक्त किशाेर बाेर्डे हे शुक्रवारी विद्यमान अायुक्त संजय कापडणीस यांच्याकडून पदभार घेणार अाहेत. तर उपायुक्त जगताप तसेच मुख्य लेखापरीक्षकसुभाष भाेर हे देखील पदभार साेडण्याची शक्यता अाहे.

वर्षांचा कार्यकाळ पूर्ण : कापडणीस जगताप यांचा जळगाव जिल्ह्यात तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला अाहे. १३ वर्षांच्या मनपाच्या इतिहासात तीन वर्षे पूर्ण करणारे पहिले अायुक्त कापडणीस ठरले अाहेत. जळगाव महापालिकेतील तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदलीचे अादेश प्राप्त झाले असून दाेन नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली अाहे.

भाेसलेंची उचलबांगडी
धुळेमनपाचे अायुक्त डाॅ. नामदेव भाेसले यांची उचलबांगडी झाली अाहे. त्यांच्या बदलीचे अादेश गुरुवारी मिळाले. त्यात १६ जूनपर्यंत डाॅ. भाेसले यांना पदभार साेडण्याचे अादेश देण्यात अाले. मात्र, त्यांनी पदभार साेडलेला नाही. नवीन अायुक्त म्हणून संगीता धायगुडे यांची नियुक्ती झाली अाहे.