आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे लुटणाऱ्या दोघांना अवघ्या तीन तासांतच अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किरण बाविस्कर, संदीप निकम - Divya Marathi
किरण बाविस्कर, संदीप निकम
जळगाव- रेल्वेस्थानक परिसरात पादचाऱ्याला मारहाण करूण सात हजार रूपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. शहर पोलिसांनी लुटमार करणाऱ्या दोन्ही भामट्यांनी तीन तासात अटक केली. 

सुभाष सुकदेव पाटील (रा.निवृत्तीनगर) हे शुक्रवारी रात्री १० वाजता रेल्वेस्थानक परिसरात कामानिमित्त आले होते. या वेळी दुचाकीने अालेल्या दोघांनी पाटील यांच्याजवळ येत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील सात हजार रूपये काढून घेत दुचाकीवरून पोबारा केला होता. या घटनेमुळे भेदरलेल्या पाटील यांनी शहर पोलिस ठाणे गाठून आपबीती सांगितली. पाटील यांनी भामट्यांच्या दुचाकीचा नंबर बघितला होता. तो नंबरही त्यांनी पोलिसांना दिला. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार वासुदेव सोनवणे, संजय शेलार, विजयसिंग पाटील, गणेश शिरसाळे, अमाेल विसपुते मोहसीन बिराजदार यांच्या पथकाने गस्त सुरू केली. 

रात्री वाजता संदीप उर्फ डॉन मधुकर निकम किरण अनिल बाविस्कर (दोघे रा.गेंदालाल मिल) हे दोघे शिवाजीनगर पुलाजवळून दुचाकीने जात होते. त्यांच्या दुचाकीचा क्रमांक ओळखताच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड.अनिवाश पाटील यांनी काम पाहिले. 

दुचाकी केली जप्त 
दोन्हीसंशयितांनी या गुन्ह्यात एक दुचाकी वापरली होती. याच दुचाकीच्या क्रमांकावरून त्यांना पकडणे सोपे गेले. पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर त्यांची दुचाकी (एमएच १९ एसी ६३७८) देखील जप्त केली आहे. तसेच त्यांनी पाटील यांच्या खिशातून काढून घेतलेल्या हजार रुपयांपैकी २५०० रूपये हस्तगत केले आहेत. दोघांवर या पूर्वीदेखील गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...