आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेच्या बंद दवाखान्यात मद्यधुंद टवाळखोरांचा धुमाकूळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मेहरूण परिसरातील अक्सानगरातील महापालिकेच्या मरहुम मोहब्बत खान मुलतानी या दवाखान्यात गुरुवारी रात्री चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्यांनी वस्तूची फेकाफेक केली अाहे. मात्र, कुठलीही वस्तू चाेरी झालेली नाही. परिसरात गेल्या काही दिवसांपासून टवाळखाेरांचा धुमाकूळ वाढलेला असून त्यांच्या त्रासाला नागरिक वैतागले आहेत.

मेहरूण परिसरातील नागरिकांना तत्काळ अाराेग्य सेवा मिळावी, यासाठी ऑगस्ट रोजी मरहुम मोहब्बत खान मुलतानी या दवाखान्याचे उद््घाटन झाले आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी पाटील यांच्यासह १८ कर्मचारी सुसज्ज प्रयोगशाळा अाहे. दवाखाना सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच परिसरातील टवाळखाेर कर्मचाऱ्यांना त्रास देत अाहेत. पतेती रक्षाबंधन अशा दोन दिवस सलग सुट्या आल्यामुळे दवाखाना बंद होता. या दरम्यान चोरट्यांनी गच्चीवर चढून तसेच मागच्या बाजूच्या चॅनल गेटच्या दरवाजाचे कुलूप तोडून दवाखान्यात प्रवेश केला. तीन-चार खोल्यांचे दरवाजे उघडून साहित्याची नासधूस केली. इन्व्हर्टर, प्रिंटर, खुर्च्या, टेबल एका खोलीतून दुसऱ्या खोलीत नेऊन ठेवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दालनांतील टेबलचे ड्राॅवर तोडून त्यातील कागदपत्र फेकले. दवाखान्यात रोख पैसे नसल्यामुळे चाेरट्यांचा नाईलाज झाला. त्यांनी कोणतीच वस्तू चोरून नेली नाही. शुक्रवारी सकाळी वाजता दवाखान्यातील कर्मचारी ड्यूटीवर आले असता, त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यामुळे याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पाेलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. भुरट्या चोरांनी केलेला हा प्रकार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पण याप्रकरणी काेणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

घरांवर दगडांचा मारा
याभागात अनेक वेळा रात्री नागरिकांच्या घरांवर दगडफेक हाेते. नशेखोर युवक गंमत म्हणून किंवा कोणी हटकले तर त्यांच्या घरावर दगड फेकतात. त्यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी दवाखान्यातील चोरीचा प्रयत्न उघडकीस अाल्यानंतर घटनास्थळी पोहाेचलेल्या पाेलिसांकडे नागरिकांनी टवाळखोरांच्या बदमाशीचा पाढाच वाचून दाखवला. तसेच या भागात रात्रीसह दिवसादेखील पोलिसांनी गस्त घालावी, अशी अपेक्षा व्यक्त केली अाहे.

टवाळखाेरांची डाेकेदुखी वाढली
अक्सानगरात मनपाचा दवाखाना, दोन शाळा मोठा रहिवासी परिसर आहे. या भागात नशेखोर टवाळखोर तरुण दररोज धुमाकूळ घालत असतात. त्यामुळे या प्रकाराला नागरिक, शिक्षक, दवाखान्यातील कर्मचारी वैतागले आहेत. या टवाळखोरांना नागरिकांनी हटकण्याचा प्रयत्न केला तर ते उलटून शिव्या देतात. त्यामुळे त्यांना बोलण्याची हिम्मत नागरिक करीत नाहीत. गुरुवारी रात्री दवाखान्यात शिरलेल्या चोरट्यांनी गच्चीवर बियरच्या बाटल्या फोडल्या, दवाखान्यात सिगारेट ओढून त्याची पाकिटे इतरत्र फेकली होती.
बातम्या आणखी आहेत...