आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राह्मण समाजालाही हवे आर्थिक विकास महामंडळ; उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- ब्राह्मण समाजातील युवकांना व्यवसायाकरिता आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासाठी बुधवारी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन देण्यात आले.

ब्राह्मण समाजाला उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्यास कार्य करता येईल. समाजातील आर्थिकदृष्ट्या मागे राहिलेल्या कुटुंबांना व्यवसायांच्या संधी उपलब्ध करून देऊन त्यांची उपजीविका विकसित करणे आवश्यक आहे. परंतु व्यवसायासाठी भांडवल लागते. अनेक कुटुंबांना ते शक्य होत नाही त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.

महासंघ जिल्हा शाखेतर्फे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोक जोशी, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अँड. सुशिल अत्रे, शुक्ल यजुर्वेदीय संघाचे अध्यक्ष अजय डोहोळे, ऋग्वेदी संस्थेचे अनंत भालेराव, चित्पावन संघटनेचे अध्यक्ष विलास खाडीलकर, कार्याध्यक्ष मुकुंद एडके, कोषाध्यक्ष नागेश लिमये, शारदा वेद पाठशाळेचे अध्यक्ष चंद्रकांत वैद्य, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे संजय शर्मा, विश्वनाथ जोशी, ब्राह्मण सेवा संघाच्या अध्यक्ष विद्या धर्माधिकारी, सुरभी महिला मंडळाच्या अध्यक्ष स्वाती कुळकर्णी उपस्थित होते. या मागण्यांसाठी बुधवारी महाराष्ट्रात ब्राह्मण महासंघांतर्फे एकाच दिवशी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. यात बहुभाषिक संघ, यजुर्वेदी, ऋग्वेदी, चित्तपावन, ब्राह्मण सेवा संघ, ब्राह्मण सभा सर्व शाखा व ब्राह्मण समाजांचा समावेश होता.
आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा, ब्राह्मण पुरोहितांना वर्षातील जेमतेम 100 दिवस रोजगार उपलब्ध होतो. या रोजगारातून मिळालेले मानधन हे फारच कमी असते. म्हणून पुरोहितांना मासिक 5 हजार रुपये मानधन मिळावे; तसेच ब्राह्मण समाजाला जाहीर सभा, मेळावे आणि खासगीतही जातीवाचक बोलले जाते असल्यामुळे समाजात असुरक्षिततेची भावना तयार झाली आहे. ब्राह्मण समाजाला मानसिक व कायदेशीर सुरक्षितता मिळावी यासाठी ब्राह्मण समाजाचा समावेश अँट्रॉसिटी कायद्यामध्ये करावा, अशाही मागण्या निवेदनात करण्यात आल्या.