आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचोऱ्यात लाचखोर शाखाधिकारी गजाआड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचाेरा - येथील सिंचन विभागाचे शाखािधकारी बळीराम केशव जाधव यांना साडे सहा हजारांची लाच घेताना गुरुवारी रंगेहाथ पकडण्यात अाले. तालुक्यातील हिवरा धरणाच्या जलाशयातून १८ वर्षे मुदतीचा पाणी उपसा करण्यास परवानगी देण्यासाठी त्यांनी ही लाच घेतली.

पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बुद्रूक शिवारात गट क्र.२१३ मध्ये तक्रारदाराची हेक्टर १२ आर कोरडवाहू शेती आहे. तक्रारदाराच्या वडिलांनी हिवरा धरण जलाशयातून १८ वर्षे दीर्घ मुदतीचा ठिबक पाणी उपसा परवानगीचा प्रस्ताव सुमारे महिन्यापूर्वी सिंचन शाखा खडकदेवळा येथे दिला होता. परंतु तुमचा पाणी मागणीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी१० हजारांची मागणी येथील शाखािधकारी बळीराम जाधव यांनी केली हाेती. पैसे देण्याची मानसिकता नसल्याने तक्रादार यांनी ही मािहती लाचलुचपत विभाग, जळगाव कार्यालयास दिली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने पडताळणी करून गुरुवार दिनांक १४ रोजी पाचोरा शहरातील हॉटेल भाग्यलक्ष्मी येथे बळीराम जाधव यांना हजार ५०० रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले.
बातम्या आणखी आहेत...