आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीजपुरवठा खंडित; पाणीपुरवठा ठप्प, जलवाहिनी दुरुस्तीच्या नावाने दाेन वेळेस बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - औद्याेगिकवसाहत ते वाघूर जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे शनिवारी अर्ध्या शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला. अनेक भागात पाणीच अाले नाही. गेल्या आठवडाभरापासून जलवाहिनी दुरुस्ती आणि वीजपुरवठा खंडित होण्यासह विविध कारणांमुळे पाणीपुरवठ्यात बदल होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

औद्याेगिक वसाहत परिसरातील ३३ केव्ही लाइनमध्ये बिघाड झाल्याने पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला होता. यामुळे शहरातील विविध भागात पुरवठ्याच्या बदलासह कमी दाबाने पुरवठा होण्याच्या सूचनाही पाणीपुरवठा विभागाने दिल्या होत्या. दरम्यान, रामानंदनगर, गणेश कॉलनीतील काही भाग, मेहरूण, आझादनगर, हरिविठ्ठलनगर यासह अनेक भागात पाणीपुरवठाच झाला नसल्याने नागरिकांची ओरड वाढली. यामुळे अनेकांना पिण्याच्या पाण्याची खासगी विहिरीवरून उपलब्धता वाढवावी लागली. आठवड्यात जलवाहिनी दुरुस्तीमुळे दोनदा पाणी वितरणात बदल करण्यात आले होते. सातत्याने असे प्रकार होत असल्याने नागरिकांमधून तक्रारी वाढल्या आहेत. पाण्याच्या वेळेत बदल झाल्याने नागरिकांचे नियाेजन काेलमडते. अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले अाहेत.

एक दिवस उशिरा पाणीपुरवठा
कंडारीभागातीलएका पोलवरील इन्सुलेटर फुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. याची दुरुस्ती करण्यात आली असून एक दिवस उशिराने कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. डी.एस. खडके, शहरअभियंता
बातम्या आणखी आहेत...