आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचप्रकरणी मुंडेंविरुद्ध धुळ्यात गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह एकाला रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रमेश भीमराव मुंडे यांच्यासह तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, तिघांची रविवारी न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली. त्यांना नाशिक येथे पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलिस ठाण्यासमोरील हॉटेल मद्यविक्रीच्या दुकानाजवळ सापळा रचून लाख २० हजार रुपयांची लाच घेताना तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस कॉन्स्टेबल अशोक पायमोडे, सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर पाटील शंकर मेघानी यांना शनिवारी ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी जबाब नोंदवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मोबाइल संभाषण तपासण्यात आले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक माधवी रघुनाथ चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिस निरीक्षक रमेश भीमराव मुंडे, सहायक पोलिस निरीक्षक कमलाकर आनंद पाटील, पोलिस कॉन्स्टेबल अशोक नाना पायमोडे वाइन शॉपचा कर्मचारी शंकर चिमणदास मेघानी यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात सन १९९८चे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७,८, १२, १३(१)(ह) सह १३ (२) /१५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारच्या कारवाईनंतर ताब्यात घेतलेल्या तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना तीन दिवस पोलिस कोठडी देण्यात आली. पोलिस निरीक्षक माधवी चौधरी तपास करीत आहेत. कारवाईनंतर ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची रविवारी सकाळी सहा वाजता जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

पोलिस अधीक्षकही रजेवर...
घटनेपर्यंत पोलिस अधीक्षक साहेबराव पाटील हे रजेवर निघून गेले आहेत. नोव्हेंबरपर्यंत ते रजेवर असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून दिली गेली. घटनेनंतर पोलिस अधीक्षक रजेवर गेल्याने त्याबाबत वेगळीच चर्चा होत आहे. मात्र, पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आपण रजेवर असल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी दिली.

मुंडे स्वीच ऑफ
तक्रारदारानेमाध्यमांना पोलिस निरीक्षकांनी लाचेची मागणी केल्याची माहिती दिली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून पोलिस निरीक्षक मुंडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक रमेश मुंडे यांचा भ्रमणध्वनी स्वीच ऑफ होता. अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांनी सीक रिपोर्ट दिल्याचे समजते.