आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाबेरावांवर दिवस होती 3 एसीबीची नजर, शिपाई आमले यांच्या घराचीही घेतली झडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव  - कारागृहातून संशयित आरोपी सतीश गायकवाड याला सिव्हिलमध्ये दाखल करून घेण्यासाठी तीन दिवसांपूर्वीच कारागृह अधीक्षक दिलीपसिंग डाबेराव यांनी बापू आमले याच्या माध्यमातून संशयितांच्या शालकाकडून हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकारामुळे संतापलेल्या गायकवाड यांच्या शालकाने त्याच दिवशी डाबेराव यांची एसीबीकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तक्रार केली हाेती. तक्रारीनंतर एसीबीने तत्काळ सापळा रचला हाेता पण ताे यशस्वी झाला नाही. त्यामुळे ते त्या दिवसापासून डाबेरावांवर नजर ठेऊन हाेते. अखेर शुक्रवारी सापळा यशस्वी होऊन डाबेरावांना अटक करण्यात आली. 
 
संशयित आरोपी सतीश गायकवाड याचे शालक (तक्रारदार) यांच्याकडून दोन दिवसांपूर्वीच लाच मागण्यात आली होती. सुरुवातीला त्यांनी हजार रुपये दिले होते. तर उर्वरित दोन हजार रुपये घेऊन बुधवारी रात्री आमले यांनी त्यांना बोलावले होते. त्यानुसार तक्रारदार कारागृहाच्या परिसरात पैसे देण्यासाठी आले {होते; पण काही कारणास्तव आमले हजर नसल्यामुळे पैसे देता आले नाही. त्या वेळी तक्रारदारांनी डाबेराव यांच्याकडे लाचेचे दोन हजार रुपये देण्याचा प्रयत्न केला होता. तेंव्हा डाबेराव यांनी हे पैसे गुरुवारी आमलेकडे द्या, असे सुचवले होते. त्या दिवशी एसीबीच्या पथकाने डाबेरावांवर नजर ठेऊन त्यांच्या कारागृहात जाण्या-येण्याच्या वेळांची नोंद ठेवली होती. गुरुवारी रात्री पुन्हा एसीबीने डाबेराव यांच्या घराजवळ सापळा रचला. तेंव्हा देखील पैसे स्वीकारले नाही. शुक्रवारी सकाळी डाबेराव यांनी पैसे घेण्यासाठी तक्रारदारांना घरी बोलावून घेतले होते. त्यानुसार सकाळी वाजता तक्रारदार दोन हजार रुपये घेऊन आले. त्यांनी डाबेरावांच्या हातात पैसे दिले. पैसे देताच बाहेर सापळा रचून असलेल्या एसीबीच्या पथकाने डाबेरावांना ताब्यात घेतले. पैसे घेण्यासाठी डाबेराव तक्रारदारांची घरीच वाट पाहत होते. तक्रारदार आले तेंव्हा ते टी-शर्ट बरमुडा पॅण्टवर घरात वाट पाहत बसले होते. डाबेराव यांना ताब्यात घेतल्यानंतर पथकाने आमलेंच्या घराकडे मोर्चा वळवला. आमलेंनाही त्यांच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. 

जेलरगेले लॉकअपमध्ये 
डाबेराव आमले यांना ताब्यात घेतल्यानंतर सायंकाळी वाजेपर्यंत घर झडती, वैद्यकीय तपासणी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता जिल्हापेठ पोलिसांनी त्यांना अटक केली. शनिवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अधिक तपासासाठी एसीबीकडून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे. दरम्यान, ४०० कैद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोकरीला असलेले कारागृह अधीक्षक डाबेराव शिपाई आमले यांना शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या लॉकअपमध्ये नेण्यात आले. 

गायकवाडयाच्याविरुद्ध केला होता डाबीरावने पत्रव्यवहार 
संशयित आरोपी सतीश गायकवाड याला रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रकरणात डाबेराव यांनी लाच मागितली आहे. तत्पूर्वी गायकवाड याने १८ डिसेंबर २०१६ रोजी कारागृहात ड्यूटीवर असलेल्या होमगार्ड संदीप ठाकरे याला मारण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भात डाबेराव यांनी जिल्हापेठ पोलिसांना पत्र देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच गायकवाडला नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवाना करावे, असे विनंती पत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेे होते. 

{ मूळचे अकोला येथील डाबेराव हे सुमारे पावणेतीन वर्षांपूर्वी जळगावात आले. त्यांच्या कार्यकाळात कारागृहात अनेक वादग्रस्त घटना घडल्या आहेत. 
{ मे २०१५ रोजी महिला कैदी बायजाबाई ऊर्फ बिनाबाई राजाराम बारेला हिने शौचालयाच्या खिडकीला साडी बांधून गळफास घेतला होता. 
{ नगरसेवक कैलास सोनवणे हे खुनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून कारागृहात असताना त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी चक्क खासगी दुचाकीवरून सोडण्यात आले. या वेळी सरकारी वाहन उपलब्ध झाले नाही प्रकृती खराब असल्यामुळे तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले. 
{ २६ मे २०१६ रोजी कारागृहात असलेला संशयित आरोपी सुधाकर मधुकर पवार याने २५ फूट उंच भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. पवार याने डाबेरावांच्या निवासस्थानाच्या अंगणातच उडी मारून पलायन केले होते. 
{ एसीबीचे तत्कालीन डीवायएसपी डी.डी.गवारे यांनी कारागृह रक्षकाला २०० रुपयांची लाच घेताना अटक केली होती. कैद्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी ही लाच रक्षकाने मागितली होती. तेंव्हा देखील डाबेराव अधीक्षक पदावर होते. 
{ अमळनेर येथील एका कैद्याला धुळ्याला उपचारासाठी हलवण्यासाठी डाबेराव यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयातून रुग्णवाहिका तर पोलिस मुख्यालयातून बंदोबस्त मागितला होता. या दोन्ही गोष्टी वेळेवर मिळाल्यामुळे डाबेराव यांनी ३१ जुलै २०१६ रोजी स्वत:च्या मोबाइलवरून व्हाॅटसअॅपवर राजीनामा पोस्ट केला होता. शासकीय पातळीवरून मदत मिळाल्यामुळे अापण पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी टाइप करून वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक ग्रुपवर पोस्ट केले होते. या राजीनामा नाट्यामुळे डाबेराव अधिकच चर्चेत आले होते. यात त्यांची सविस्तर चौकशीदेखील झाली हाेती. 
 
अकाेला येथील घराचीही तपासणी 
एसीबीच्या पथकाने डाबेराव यांच्या शासकीय निवासस्थानाची तपासणी केली. तेव्हा दोन बँकांचे पासबुक, एका बँकेत ५० हजार रुपये जमा असल्याची माहिती मिळाली. याशिवाय इतर काही मिळाले नाही. तर याच वेळी डाबेराव यांच्या अकोला येथील घरी तेथील एसीबीचे पोलिस निरीक्षक ईश्वर चव्हाण यांनी छापा मारला. त्या घरातही महत्त्वाची कागदपत्रे किंवा पैसे मिळून आले नाहीत. तसेच कारागृह परिसरातच राहणारे आमले यांच्या घराचीही झडती घेण्यात आली. तेथे देखील काहीही आढळून आले नाही. 
 
बातम्या आणखी आहेत...