आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचखाेर जि.प.कर्मचारी अटकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याकडेच प्रवासभत्ता मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या आस्थापना विभागाचा कनिष्ठ सहायक अशोक रामदास सोनवणे याला १९०० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी पावणेपाच वाजता ही कारवाई केली.

यातील तक्रारदार हे जिल्हा परिषदेत उपयांत्रिकी विभागात उपअभियंता या पदावर नोकरीस आहेत. सध्या ते प्रतिनियुक्तीवर चालक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. त्यांचे मागील १८ महिन्यांचा प्रवासभत्ता बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात सोनवणे याने त्यांच्याकडे १९०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदार यांचे बिल मागील आठवड्यात मंजूर होऊन त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली होती. तरीदेखील सोनवणे याने पुन्हा लाच मागितली. पैसे दिल्यास पुढील बिल मंजुरीसाठी पाठवणार नाही, असा दमही भरला हाेता. त्यानुसार बुधवारी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. विभागाच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची चौकशी केली. खात्री पटल्यानंतर सायंकाळी पावणेपाच वाजता जिल्हा परिषद आवारातच सापळारचून सोनवणे याला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी करीत आहेत.