आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे मनपातील लाचखाेर अटकेत, माेबदला काढण्यासाठी मागितले १८ हजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - महापालिकेच्या प्रकल्प कार्यालयात डाटा एंट्रीचे काम केल्याच्या माेबदल्याची रक्कम घेण्यासाठी १८ हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महापालिकेचे समूह संघटक रामराव साेनवणे याला अटक केली आहे.
महापालिकेच्या प्रकल्प कार्यालयातर्फे बचत गट स्थापन करण्यासह त्यांना कर्जपुरवठा करण्यात येतो. या कामाची संगणकीय नाेंद ठेवली जाते. संगणकात डाटा एंट्री करण्याचे काम काही जणांकडून करून घेण्यात आले होते. त्यांच्या कामाचे बिल लाख ७१ हजार ९०० रुपये इतके झाले हाेते. ही रक्कम धनादेशाद्वारे शहरातील बचतगटांच्या नावे काढण्यात अाली. बचत गटाकडून ही रक्कम बँकेतून काढून घेत ती महापालिकेचे समूह संघटक रामराव साेनवणे यांनी स्वत:कडे ठेवली. त्यानंतरही रक्कम घेण्यासाठी आलेल्या संबंधितांकडे साेनवणे याने १८ हजार रुपयांची लाच मागितली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यांच्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २१ मार्च २०१६ राेजी पंचासमक्ष पडताळणी केली. या वेळी समूह संघटक रामराव साेनवणे यांनी तक्रारदाराकडे २०१५ मध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साेनवणे याला सोमवारी अटक केली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस उपअधीक्षक शिवाजी बुधवंत,पाेलिस निरीक्षक विजय चाैरे यांच्यासह पथकातील पाेलिस हेड काॅन्स्टेबल अरुण पाटील, जितेंद्र परदेशी, प्रवीण अमृतकर, संताेष माळी, किरण साळी, संदीप पाटील, मनाेहर ठाकूर, कैलास िशरसाठ, संताेष हिरे, संदीप सगर, सुधीर साेनवणे, संदीप कदम आदींनी ही कारवाई केली. रामराव साेनवणे याला उद्या मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
बातम्या आणखी आहेत...