आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उड्डाणपूल, बजरंग बोगद्यासाठी महासभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बजरंग बोगद्यात पावसाळ्यात असे पाणी साचत असते. (फाईलफोटो)
जळगाव- महापालिकेच्या खराब आर्थिक परिस्थितीमुळे प्रस्तावित उड्डाण पुलांचे काम आणखी काही वर्षे हाेणे शक्य नाही. परंतु, केंद्र किंवा राज्य सरकारने विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिल्यास ही समस्या सुटू शकते. त्यादृष्टीने आता महापालिकेने हालचाली सुरू केल्या असून, विशेष महासभा घेऊन तसा ठराव करण्यात येणार आहे. तसेच निधीसाठी पाठपुरावा करण्याची जबाबदारी खासदार ए.टी.पाटील यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
महापालिकेची विशेष महासभा शुक्रवारी सकाळी ११ वाजता महापौर राखी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयाेजित करण्यात आली आहे. या सभेत चर्चेसाठी उड्डाणपूल बजरंग बोगद्याच्या बांधकामाशी निगडित विषयांचा समावेश करण्यात आला आहे. शविाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाची मुदत संपलेली आहे. त्यामुळे हा पूल केव्हाही कोसळून जीवित वा वित्तहानी हाेऊ शकते. नवीन पुलासाठी रेल्वे विभागाकडून मंजुरी मिळाली असून, मनपाला यासाठी ६६ कोटींचा आपला हिस्सा भरावा लागणार आहे. िशवाजीनगर उड्डाणपूल, िपंप्राळा उड्डाणपूल बजरंग रेल्वे बाेगद्याच्या कामासाठी रेल्वे विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

१० टक्के हिस्सा अशक्य
जळगावशहर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. पालिकेवर हुडको जिल्हा बँकेचे कर्ज आहे. त्यामुळे हे प्रकल्प पालिकेमार्फत राबवणे सद्य:स्थितीत अशक्य आहे. पिंप्राळा उड्डाणपूल, बजरंग रेल्वे बोगदा शिवाजीनगर उड्डाणपूल हे प्रकल्प हाेत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. बजरंग रेल्वे बोगद्यात पाणी साचून रस्ता नेहमीच बंद होतो. येण्या-जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने नागरिकांची तारांबळ उडते. त्यामुळे आता केंद्र वा राज्याच्या निधीतून रेल्वे विभागाने हे प्रकल्प करावेत, असा प्रस्ताव खान्देश विकास आघाडीकडून देण्यात येणार आहे. त्यासाठी निधी मिळावा म्हणून पाठपुरावा करण्याकरिता खासदारांना वनिंतीपत्र देण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे.
‘स्पेशल केस’ म्हणून प्रयत्न करणार
- शिवाजीनगर पुलाची कालमर्यादा संपली असून, तो पाडून नवीन पूल उभारणे गरजेचे आहे. मनपाला यासंदर्भात पत्रदेखील देण्यात आले होते. हा पूल मनपा हद्दीत असल्याने तो स्वत बांधणार, असे मनपाचे म्हणणे होते. रेल्वेने त्यासाठी कोटी २५ लाखांचे कोटेशनही दिले आहे. या दोन्ही पुलांच्या उभारणीसाठी मी रेल्वेमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. ५० टक्के पैसे मनपा देऊ शकत नाही. त्यामुळे मनपाने ठराव करून दिल्यास विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्यांना वनिंती करता येईल. तसेच त्यांनी हमीपत्र दिल्यास पुलाचा विषय मार्गी लागू शकेल.
ए. टी. पाटील,खासदार
बातम्या आणखी आहेत...