आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायतींमध्ये‘ब्रॉड बँड’ सेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - केंद्र शासनाकडून भारत ब्रॉड बँड नेटवर्क लिमिटेडमार्फत आणि ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे सर्व ग्रामपंचायतींना ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध होणार आहे. भुसावळ तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींमधील नागरिकांना कमी वेळेत वेगवेगळ्या सुविधा मिळाव्यात, हा या योजनेमागील हेतू आहे.

केंद्र शासनाने नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क योजनेद्वारे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे ब्रॉड बँड इंटरनेट कनेक्शन देणारा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी शासनाने भारत ब्रॉड बँड नेटवर्क लि. कंपनी स्थापन केली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी युनिव्हर्सल ऑब्लिगेशन फंडामधून निधी मिळेल. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क ही राष्ट्रीय संपत्ती म्हणून निर्माण करण्यात येत असून राज्यातील सर्व ग्रामपंचायतस्तरापर्यंत उच्च क्षमता व उच्च दर्जाची ब्रॉड बँड सेवा उपलब्ध होईल. यामुळे जन्म-मृत्यू नोंद, नमुना 8, 1-17 नमुने (ग्रामपंचायत दप्तर), रहिवासी दाखले, बांधकाम परवाना, विविध कंपन्यांचे रिचार्ज व्हाउचर्स, एलआयसी प्रीमियम, पॅनकार्ड देणे, मतदार नोंदणी, आधारकार्ड नोंदणी, रेल्वे-बस बुकिंग, शेतकरी नोंदणी, स्वावलंबन पेन्शन योजना, या सुविधा निवडक संग्राम केंद्रात सुरू आहेत. ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटीमुळे या सुविधांना अधिक गती मिळेल.

सामंजस्य करार
योजनेसंदर्भात 12 एप्रिल 2013 रोजी त्रिपक्षीय सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार ग्रामपंचायतस्तरापर्यंत ऑप्टिकल फायबर नेटवर्कद्वारे डेडिकेटेड ब्रॉड बँड विथसह इंटरनेट ब्रॉड बँड कनेक्टिव्हिटी मिळाल्याने ई-गव्हर्नन्स, ई-पंचायत (संग्राम) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कामाला गती येईल
तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष सुरू आहे. शासनाच्या नवीन निर्णयाबाबत आदेश प्राप्त होताच संबंधित कंपनीला सहकार्य करण्यात येईल. नवीन प्रणालीमुळे कामाला गती येईल. किशोर सपकाळे, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत), पंचायत समिती, भुसावळ