आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्यांच्या अर्जावर कुटुंबप्रमुखाची स्वाक्षरी, दलालास शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी बदडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - तांबापुरातील अशिक्षित महिलांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर कुटुंबप्रमुख म्हणून स्वाक्षरी करून पन्नास रुपये घेणाऱ्या नसीर खान या दलालास शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारी दुपारी वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात पकडले. त्यानंतर चांगलाच चोप देत तहसीलदारांकडे नेले. मात्र, तहसीलदार बैठकीला गेलेले असल्याने माफी मागितल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले.

प्राधान्य कुटुंब गटात समावेश हाेऊन रेशनच्या धान्याचा लाभ मिळण्यासाठी तहसील कार्यालयात उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सध्या रेशन कार्डधारकांची गर्दी होत आहे. त्यामध्ये निरक्षर महिलांना अर्ज भरता येत नसल्याचा फायदा घेण्यासाठी दलाल सक्रिय झाले आहेत. बुधवारी नसीर खान हा दलाल तांबापुरातील महिलांना उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठीचा अर्ज भरून देण्यासाठी पन्नास रुपये घेत होता. त्याचप्रमाणे त्या अर्जावर कुटुंबप्रमुख म्हणून बनावट स्वाक्षरीकरीत होता.
हा प्रकार शिवसेनेच्या शोभा चौधरी, मनीषा पाटील, सुनीता भालेराव, विमल वाणी, आशा खैरनार या महिला पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी खान याला पकडून चांगलाच चोप दिला. त्याला तहसीलदार अमोल निकम यांच्या कार्यालयात आणले. मात्र, तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेलेले होते. या वेळी खान याने सर्वांची माफी मागून यापुढे असा प्रकार करणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला सोडून दिले.
बातम्या आणखी आहेत...