आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईद मिलनानंतर बहिणीला भेटून परतताना भावाचा अपघाती मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ईद मिलनानंतर बहिणीला भेटून परत येत असताना सिमेंटच्या ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने शाहुनगरातील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. विदगाव रस्त्यावर गुरुवारी सायंकाळी वाजता हा अपघात झाला. मुजाहीद शेख सलीम असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

ईदनिमित्त गुरुवारी तन्वीर बेग समशेर बेग सोहेल बेग समशेर बेग (वय २२ रा. खडकी चाळ) हे दोन्ही भाऊ आत्याचा मुलगा मुजाहीद शेख (वय २०) आणि वसीम शेख हे दुपारी ३.४५ वाजता साकळी (ता.यावल) येथील बहिण तरन्नुम बेग समशेर बेग यांच्याकडे भेटीसाठी दोन दुचाकींवर गेले होते. ते चौघे सायंकाळी ४.४५ वाजता साकळी येथे पोहोचले. तेथे दीड तास थांबल्यानंतर पुन्हा जळगावला येण्यासाठी निघाले. एक दुचाकी सोहेल बेग चालवत होता. त्याच्या पाठीमागे मुजाहीद बसला होता. दुसरी दुचाकी तन्वीर चालवत होता. त्याच्या त्याच्या पाठीमागे वसीम बसलेला होता. विदगाव रस्त्यालगत असलेल्या फार्मसी कॉलेजच्या पाठीमागे जळगावकडून सिमेंटचा ट्रक येत होता. त्या वेळी सोहेलची दुचाकी समोर होती. त्याच्या पाठीमागून तन्वीर दुचाकीवर येत होता. ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने सोहेलच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे त्याच्या मागे बसलेल्या मुजाहीदचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सोहेलच्या पोटाला डोक्याला गंभीर दुखापत झाली अाहे. तन्वीर वसीमची दुचाकीमागे असल्याने ते थोडक्यात बचावले. मात्र, अपघात बघून ते चांगलेच भेदरले. अपघातानंतर दोन्ही दुचाकी ट्रक घटनास्थळीच होता.

कुणीही वाहन थांबवले नाही
मुजाहीदसोहेल हे १५ ते २० मिनीटे घटनास्थळावरच पडून हाेते. मात्र, त्यांच्या मदतीला कुणीही धावले नाही. शेवटी एका अॅटोरिक्षामध्ये दोघांना टाकून जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, डॉक्टरांनी मुजाहीदला मृत घोषित केले. सोहेलची प्रकृती गंभीर असून त्याला खासगी रुग्णालयात हलवले आहे. मृत मुजाहीद शेख हा पेंटिंगचे काम करीत होता. त्याच्या पश्चात तीन भाऊ आई,वडील आहेत. सोहेल तन्वीर या दोन्ही भावांचे नवीपेठेत नॅशनल आॅप्टिकल्स हे दुकान आहे.

शिरखुर्मा खाऊन भाच्यासोबत खेळले
साकळीयेथे या चौघांनी ईदनिमित्त तरन्नुम बेग यांची भेट घेतली. बहिणीच्या घरी शिरखुर्मा खाऊन चहा पिला. त्यानंतर आठ महिन्यांचा भाचा अली याचेही त्यांनी लाड केले. त्याच्यासाेबत खेळले. दीड तास ते बहिणीच्या घरी होते. बहिणीचा निरोप घेऊन ते दोन दुचाकींवर जळगावला येण्यासाठी निघाले होते.
बातम्या आणखी आहेत...