आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीएसएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या, आठ दिवसांनी पंजाब प्रवासासाठी निघणार होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: परमानंद पाटील
चोपडा - तालुक्यातील आडगाव येथील रहिवासी परमानंद पंडित पाटील (वय २५ ) याने मंगळवारी सकाळी आडगाव येथील स्वतःच्या शेतात कडुनिंबाच्या झाडास दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परमानंद पाटील हा पंजाब येथील वाघा बॉर्डर येथे बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल जीडी या पदावर कार्यरत होता. तो दोन महिन्यांच्या सुटीवर घरी आला होता. त्याची सुटी चार-पाच दिवसांत संपणार होती. त्यानंतर तो पुन्हा ड्यूटीवर जाणार होता. तत्पूर्वी मंगळवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्याने आपले आयुष्य संपवले. आत्महत्येचे निश्चित कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल वसंत चव्हाण करीत आहेत. त्याच्या पश्चात आई-वडील दोन भाऊ असा परिवार आहे.
त्याएेवजी तो वाघा बाॅर्डरवर परत गेला असता
जवानपरमानंद दोन महिन्यांची सुटी संपून दि. १९ जानेवारी रोजी आपल्या ड्युटीवर जाण्यासाठी येथून निघणार होता. त्यासाठी रेल्वे प्रवासी तिकिटाचे आरक्षणसुद्धा त्यानेच केलेले होते, अशी माहिती मृत परमानंदचा लहान भाऊ गिरीश याने दिली. पाच वर्षे बीएसएफमध्ये सेवा बजावून वेतनातून जमा केलेल्या रकमेतून स्वत:चे घर व्हावे, याकरिता आठ-दहा दिवसांपूर्वी १५ लाखांचे तयार घर बोरोलेनगर (चोपडा) येथे घेतले. त्याच्या विवाहाची चर्चाही कुटुंबात चालली होती. दोन महिन्यांच्या सुटीत जळगाव जिल्ह्यातील नातेवाईक, मित्र मंडळींच्या त्याने भेटी घेतल्या होत्या. आजही सकाळी त्याने काही मित्रांच्या भेटीगाठी घेतल्या.

गावावर शोककळा
मंगळवारी सकाळी मला जळगाव येथे काम होते, म्हणून मला मोटारसायकलवर कारगील चौक (चोपडा)पर्यंत सोडून बसमध्ये बसवायला आला होता. त्यानंतर तो लागलीच घरी गेला आणि सकाळी ९.३० वाजता त्याने शेतात जाऊन गळफास घेतला. आम्हाला त्या घटनेवर अजिबात विश्वास बसत नाही. आत्महत्या करण्याएेवजी तो परत सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी गेला असता तर 'परमानंद' झाला असता, असे म्हणत आेक्साबोक्सी रडत गिरीश "दिव्य मराठी'शी बोलत होता. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.