आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Budget Home Sanction Corruption Issue In Jalgaon Corporation

गरिबांची घरकुले पालिका कर्मचाऱ्यांच्या नावे सर्वेक्षणात झाले उघड; ७६ जणांची यादी तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - झोपडमुक्ती जळगाव शहराच्या संकल्पनेसाठी राबवण्यात आलेल्या घरकुल योजनेतील अनेक घरांवर गरिबांऐवजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचाच ताबा आहे. महापालिकेने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महापालिका प्रशासन लवकरच कायदेशीर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

जळगाव शहरातील झोपडपट्टीचे उच्चाटन करून झोपडपट्टीधारकांना पक्क्या घरांमध्ये स्थलांतरित करण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेने घरकुल योजना राबवली होती. परंतु, सध्या या घरांमध्ये अनेक नोकरदार, उच्चशिक्षितांनी ताबा मिळवला आहे. गेल्या १५ दिवसांपूर्वी काही अंध अपंग बांधवांनी महापालिकेसमोर उपोषण केले होते.

आमदार सुरेश भोळे यांनी त्यांच्या उपोषणाची सांगता करताना आंदोलनकर्त्यांना पर्यायी जागा किंवा घरकुलांचे सर्वेक्षण करून रिक्त घरकुल देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पालिकेच्या किरकोळ वसुली विभागाने गेंदालाल मिल, शिवाजीनगर, पिंप्राळा, वाल्मीकनगर, शिवाजीनगर आदी भागांतील घरकुलांचे सर्वेक्षण सुरू केले. त्याचा अहवाल नुकताच तयार करण्यात आला आहे. त्यात पालिकेच्या ७६ कर्मचाऱ्यांच्या नावावर घरकुले आढळून आली आहेत. त्यांनी ती घरकुले भाड्याने अथवा नातलगांना वापरायला दिली आहेत. पालिकेच्या मालकीची चार हजार ५४१ घरकुले आहेत. या घरकुलधारकांकडून प्रति महिना पाच रुपये भाडे आकारले जाते.

परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून घरकुलधारकांनी कोणताही भरणा केलेला नाही. त्यामुळे घरकुलधारकांकडे तब्बल ११ कोटी रुपये थकले आहेत. सर्वेक्षणात गेंदालाल मिल परिसरात ३१, वाल्मीकनगरात ११, पिंप्राळा हुडकोत २८ तर शिवाजीनगरात सहा, असे एकूण ७६ घरकुले महापालिका कर्मचाऱ्यांच्या नावावर आहेत.