आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव - शनिपेठ चौघुले परिसरातील इमारत पावसामुळे कोसळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पावसामुळे शनिपेठ चौघुले प्लॉट परिसरातील दोन मजली इमारत कोसळल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या घटनेत प्राणहानी झाली नसून पडाऊ इमारत दुरुस्त करण्याची फेर नोटीस मनपाने बजावली आहे.

अ‍ॅड. अनिल चौघुले यांच्या मालकीची ही इमारत आहे. या ठिकाणी प्रल्हाद सोनवणे (वय 68) आणि त्यांची पत्नी विजया सोनवणे भाडेकरू म्हणून राहतात. इमारत कोसळल्याच्या घटनेत कोणतीही प्राणहानी झालेली नाही. मनपा अधिका-यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, संबंधितांना 5 मे 2014 रोजी पडाऊ इमारतीच्या दुरुस्तीची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतरही मालकाने कोणतीही खबरदारी न घेतल्याने ही दुर्घटना घडली आहे, त्यामुळे प्रशासनातर्फे संबंधितांना फेर नोटीस बजावली आहे.
नोटीस बजावण्याची कारवाई नावाला
पालिकेतर्फे दरवर्षी पडक्या इमारतींना नोटीस बजावली जाते. यंदाही 157 पडक्या इमारतींना नोटीस बजावली होती. तरी देखील इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या दृष्टीने कारवाई केली जात नाही.