आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपर बंधाऱ्यातील साठा फक्त चार दिवस पुरणार, रेल्वे हद्दीत पुन्हा तीव्र पाणीटंचाईचे संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - रेल्वेच्या अपर बंधाऱ्यात चार दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. तर हतनूरचे अावर्तन आगामी अाठवडाभरात सोडले जाणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यातील पातळी खालावल्याने, रेल्वे हद्दीत टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
टंचाईच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने ४० टक्के पाणीकपात केली अाहे. त्यामुळे रेल्वेतर्फे दरराेज ८० लाख लिटर पाण्याचे वितरण केले जात अाहे. हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन मिळावे, अशी मागणी रेल्वे प्रशासनाने केली आहे. मात्र, आठवडाभरात आवर्तन मिळणार अाहे. आवर्तन बंधाऱ्यात पोहोचण्यासाठी तीन ते चार दिवस लागतील. दरम्यानच्या काळात टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

साठा३० दिवस पुरेल :१५ बंगला भागात विहीर कूपनलिका पुनर्जीवित करून पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे या भागात टंचाई जाणवणार नाही. तसेच ४० बंगला भागातही दाेन विहिरी एक कूपनलिकेचे पाणी वापरले जाईल. त्यामुळे बंधाऱ्यातील पाण्याचा वापर कमी होणार आहे. बंधाऱ्याची उंची वाढवण्याचे काम सुरू अाहे. त्यामुळे २० दिवस पुरणारा साठा ३० दिवस पुरणार आहे.

मे महिन्यात कपातीची शक्यता
रेल्वे हद्दीत ४० टक्के पाणीकपात केल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता कमी वेळ पाणीपुरवठा केला जातो. हतनूर धरणात केवळ २१ टक्के साठा शिल्लक असल्याने, आगामी मे महिन्यात पुन्हा टंचाईच्या झळा तीव्र हाेणार अाहेत. म्हणून रेल्वे प्रशासनातर्फे मे महिन्यात आणखी १० ते २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

जलप्रदूषणाला आळा
रेल्वे प्रशासनाला दरराेज ८० लाख लिटर पाण्याची गरज भासते. मात्र, टंचाईमुळे पाणीसाठा अत्यल्प असल्याने काटकसरीने वापरावर भर दिला जात आहे. यापूर्वीच रेल्वे प्रशासनाने आपल्या हद्दीत ४० टक्के पाणीकपात केल्याने, यात आणखी कपात केली जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. रेल्वेच्या साठवण तलावात येणारे सांडपाणी इतरत्र वळवण्यासाठी ६०० फूट लांबीची पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्णत्वास लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे बंधाऱ्यात सांडपाणी मिसळणार नाही.

गळती रोखण्यावर लक्ष केंद्रित
रेल्वेच्या पाणीपुरवठा विभागाने सध्या वाया जाणाऱ्या पाण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार वापरात नसलेले ६०० नळकनेक्शन ताेडण्यात अाले अाहेत. तसेच हद्दीतील पाणीगळती रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यामुळ जलवाहिनीवरील गळत्यांची तत्काळ दूरुस्ती केली जात आहे.
बातम्या आणखी आहेत...