आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरफोडी करताना चोरटा जेरबंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - एकाच दिवसात चार घरफोड्या आणि सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली असून शुक्रवारी मध्यरात्री एका चोरट्याला घरफोडी करतानाच पकडण्यात आले. तर कुसुंबा नाक्याजवळ पोलिसांना चकवून पळून जाणाऱ्या एका हिस्ट्रीशिटरच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शहरात पोलिस यंत्रणेची तपासचक्रे वेगात फिरत असताना बोदवड येथे एका सोनसाखळी चोराला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान, चोरी,घरफोडी विरोधात तपास यंत्रणा कामाला लागली असतानाच दुसरीकडे पोलिसांनी जनजागृती मोहीमही हाती घेतली आहे. शहरात कॉर्नर मीटिंग, मोहल्ला

शहरात शुक्रवारी चार ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. शुक्रवारी शहरातील द्वारकानगर, महाजननगर, हरीशनगर आणि राधाकिसनवाडी, अशा चार ठिकाणी भरदिवसा घरफोडी झाली होती. यात लाख ३० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला होता. दिवसाढवळ्या झालेल्या या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. त्यामुळे पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवून १० तासांच्या आत भूषण बोंडारे याला आदर्शनगरमधून अटक केली. कडीकोयंडा तोडून घरफोड्या करण्यात भूषण सराईत आहे. शुक्रवारी झालेल्या चारही घरफोड्या त्याच पद्धतीने झाल्या आहेत. कोयंडा तोडून चोरी करण्याची पद्धत भूषणचीच आहे. त्यामुळे शुक्रवारी झालेल्या घरफोड्यांच्या संशयाची सुई त्याच्यावरच असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांनी सांगितले.

चोऱ्या रोखण्यासाठी पुण्यात झाली बैठक
राज्यभरातसुरू असलेल्या सोनसाखळी चोरीच्या मालिकांमुळे २२ जुलैला पुणे येथे सर्व जिल्ह्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांची बैठक घेण्यात आली. त्यात चोऱ्या रोखण्यासाठी काय केले पाहिजे? गुन्हेगार शोधण्यासाठी काय केले पाहिजे? या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. सोनसाखळ्या चारी करणारे अनेक चोरटे कोरेक्स, रेसकॉप औषध तसेच प्लास्मा प्रोक्झिनसारख्या गोळ्या खाऊन चोरी करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच इराणी चोरांच्या मोटारसायकलला हिरव्या रंगाचा ताईत लावतात असेही सांगण्यात आले.

एमआयडीसी पोलिसांनी पकडला हिस्ट्रीशिटर
एमआयडीसीपोलिसांच्या पथकाने शुक्रवारी केलेल्या नाकाबंदीत कुसुंबा नाक्याजवळ अट्टल घरफोड्याला अटक केली. त्याच्यावर यापूर्वी दोन घरफोड्या, एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. एमआयडीसी पोलिस शुक्रवारी नाकाबंदी करीत असताना त्यांनी कुसुंबा नाक्याजवळ अनिल रुपचंद राठोड (वय २५, रा. रायपूर) याला ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळपासूनच पोलिस निरीक्षक बी. के. कंजे यांनी नाकाबंदी सुरू केली होती. यादरम्यान अनिल विनाक्रमांकाच्या गाडीवर फिरताना आढळला. त्याला हटकले असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

प्रेमनगरातील सोनसाखळी चोरीतील संशयित अटकेत
जिल्ह्यातसध्या घरफोड्या आणि सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला आहे. सोनसाखळी चोर पकडण्यात पोलिसांना यश आले नव्हते. मात्र, शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोदवड येथे वृद्ध महिलेची सोनसाखळी चोरताना दोघा चोरट्यांना अटक करण्यात यश आले आहे. बोदवड शहरातील तपासी हाैसिंग सोसायटीतील भाजपच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष कस्तुराबाई त्र्यंबक घुले (वय ५८) यांना शनिवारी सायंकाळी ६.३० वाजता दोघे तरुणांनी दत्त मंदिर कुठे आहे, असे विचारले. पत्ता विचारत असताना बजाज पल्सर २२० वरील (एमएच-३०-एसी-७९३९) मागच्या तरुणाने घुले यांच्या गळ्यातील सोनसाखळी आेढली. त्याचवेळी त्याच्या मागावर असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र पाटील आणि रमेश चाैधरी यांनी तत्काळ झडप घालून त्यांना पकडले. यात सादिक अलीबाबत अली आणि शेरू सल्तनत इराणी या भुसावळमधील अट्टल गुन्हेगारांना अटक करण्यात यश आले.

गुन्हेउघडकीस येणार
शहरातअनेक ठिकाणी सोनसाखळी चोऱ्या झाल्या आहेत. यापैकी शुक्रवारी झालेल्या प्रेमनगरातील सोनसाखळी चोरीत बारीक दाढी असलेल्या तरुणाने चोरी केल्याचे फिर्यादीने सांगितले होते. बोदवड येथे पकडलेल्या शेरूचीही त्याच पद्धतीची दाढी आहे. प्रेमनगरातील चोरीही त्यानेच केल्याचा संशय आहे.

आदर्शनगरात रंगेहाथ पकडले
आदर्शनगरातीलवसंत विहार अपार्टमेंटमध्ये कल्पना म्हैसकर यांचा फ्लॅट आहे. अनेक दिवसांपासून हा फ्लॅट रिकामा आहे. शनिवारी पहाटे वाजेच्या सुमारास भूषण ऊर्फ जिगर रमेश बोंडारे (वय २१, रा. उमाळा) याने म्हैसकर यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्याच वेळी रामानंदनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण वाडिले, श्यामराव पवार, प्रदीप चौधरी, शरद पाटील, किरण पाटील, हितेश बागुल आणि महेंद्र पाटील हे गस्तीवर होते. त्या वेळी वसंत विहार अपार्टमेंटच्या खाली विनाक्रमांकाची मोटारसायकल लावलेली दिसली. त्यामुळे शंका आल्याने पोलिसांनी अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. त्या वेळी भूषण हा म्हैसकर यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी करण्याच्या उद्देशाने आत शिरला होता. त्याला पोलिसांनी अटक केली. भूषणवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला शनिवारी न्यायाधीश ए. डी. बोस यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. अनिल बागले यांनी तर आरोपीतर्फे अॅड. सत्यजीत पाटील यांनी कामकाज पाहिले.

पोलिसांनी घेतली कॉर्नर मीटिंग
घरफोड्यांवरिनयंत्रण आणण्यासाठी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी. के. कंजे यांनी शनिवारी शहरात काॅर्नर मीटिंग, मोहल्ला कमिटीच्या नगरसेवकांच्या बैठका घेतल्या. तसेच प्रत्येक काॅलनीतील ते तरुणांसह एक पोलिस कर्मचारी, अशी रात्रीची गस्त घालणार आहेत. अपार्टमेंटमधील वॉचमनांचीही बैठक घेण्यात आली.
जिल्हापेठपोलिसांची दिवसा गस्त
चोरट्यांनीदिवसाढवळ्या घरफोड्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे जिल्हापेठ पोलिसांनी शनिवारी दिवसाही गस्त घातली. तसेच रात्री नाकाबंदी करून विनाक्रमांकाच्या दुचाकीचालकांची चौकशी केली.
सोमवारी नागरिकांसोबत बैठक
जानेवारीते जुलै महिन्यात झालेल्या सोनसाखळी चोऱ्यांपैकी २९ चोऱ्या अजून उघडकीस आलेल्या नाहीत. त्यामुळे एलसीबीतर्फे सोमवारी ज्यांच्या सोनसाखळ्या चोरी झाल्या आहेत. त्यांची बैठक बोलावणार असल्याची माहिती निरीक्षक रायते यांनी दिली. बैठकीत राज्यभरातील सोनसाखळी चोरांचे फोटो ज्यांच्या घरात चोरी झाली आहे, अशा नागरिकांना दाखविण्यात येणार आहेत. त्यानंतर काही दिवसांत ज्यांच्या घरी घरफोड्या झाल्या आहेत. त्यांचीही बैठक बोलावणार असल्याचे त्यांनी सांगितले.