आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंद घरांची माहिती पाेलिसांना देणे भाेवले; शहरात 4 ठिकाणी घरफाेडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - चाेरट्यांचाशहरात बारमाही धुमाकूळ सुरू अाहे. अपूर्ण मनुष्यबळामुळे पोलिस अपयशी ठरत आहेत. तसेच पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याबाबत केलेल्या अावाहनाकडे दुर्लक्ष केल्याने रविवारी शहरात चार घरफाेड्या झाल्या. दाेन पाेलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या चार ठिकाणांपैकी तीन ठिकाणचे नागरिक दाेन महिन्यांपासून बाहेरगावी गेले हाेते. तीच घरे चाेरट्यांनी चाेरीसाठी लक्ष्य केली अाहेत. तर चाैथ्या ठिकाणचे घरमालक दाेन दिवसांसाठी बाहेरगावी गेले हाेते. या घरातून २३ हजारांचा एेवज चाेरीला गेला अाहे. उर्वरित तीन घरांत चाेरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.
रामानंदनगरपाेलिस ठाण्याच्या हद्दीत घरफाेडी करणाऱ्यांना शहर पाेलिसांच्या पथकाने शनिपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीतून अटक केली. त्यामुळे उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी साेमवारी शनिपेठ पाेलिस ठाण्याच्या डीबी पथकाची चांगलीच हजेरी घेऊन कारवाईचा इशारा दिला अाहे.

श्रद्धा काॅलनीतील चाेरीप्रकरणी शहर पाेलिसांनी राजेंद्र गुरव, समाधान काेळी यांना अटक केली. दाेघे शनिपेठ पाेलिस ठाण्याच्या हद्दीत राहतात. तसेच या चाेरीतील त्यांचे साथीदार राहुल काेळी अाणि भगवान काेळी हेसुद्धा शनिपेठ हद्दीतच राहतात, मात्र ते अजूनही फरार अाहेत. शिवाय ते हिस्ट्रीशिटर गुन्हेगार अाहेत. शनिपेठ पाेलिसच्या डीबी पथकाला याविषयी माहितीमिळत नाही. त्यामुळे उपविभागीय पाेलिस अधिकारी सांगळे यांनी पाेेलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले.

केस : हायवेदर्शन काॅलनीतील घर फाेडले
हायवेदर्शनकाॅलनीतील बन्सीलाल पाटील (वय ६२) हे राहतात. ते दाेन महिन्यांपूर्वी गुडघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे मुलाकडे गेलेले हाेते. रविवारी जगन्नाथ पाटील यांना कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांनी बन्सीलाल पाटील यांना कळविले. त्यानंतर ते दुपारी ते घरी अाले. चाेरट्यांनी कुलूप ताेडून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले दिसले; परंतु काहीच चाेरी झालेले नाही. { उर्वरित.पान

केस : स्टेट बँक काॅलनीमध्ये निराशा
स्टेटबंॅक काॅलनीतील राज्य परिवहन महामंडळाचे निवृत्त अधिकारी बी. एन. पाटील यांच्या मुलाचे दाेन महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले. त्यामुळे ते दत्त काॅलनीत राहत अाहे. त्यामुळे दाेन महिन्यांपासून स्टेट बॅंकेतील घर बंद हाेते. साेमवारी सकाळी त्यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी घराचे कुलूप तुटल्याचे सांगितले. चाेरट्यांनी घरातील साहित्य फेकलेले हाेते. घरात काहीच नसल्याने चाेरट्यांच्या हाती काहीच लागले नाही.

अाशाबाबा नगरातील प्लाॅट क्रमांक १० मध्ये सुप्रीम कंपनीचे मनुष्यबळ विकास विभागाचे कार्यकारी अधिकारी श्याम पुंडलिक जगताप (वय २३) हे राहतात. ते मूळचे मलकापूर येथील अाहेत. त्यांच्या भावाचे लग्न ठरल्याने त्यांच्या पत्नी काही दिवसांपासून मलकापूर येथे गेलेल्या अाहेत. तसेच श्याम जगतापही शनिवारी रात्री मलकापूर येथे जाऊन साेमवारी सकाळी परत येतात. साेमवारी सकाळी वाजेच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी त्यांना त्यांच्या घराचा काेयंडा तुटलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर ते १०.३० वाजता घरी अाल्यानंतर चाेरी झाल्याचे निष्पन्न झाले. चाेरट्यांनी रविवारी रात्री १० ते साेमवारी सकाळी वाजेच्या दरम्यान घरातील एलईडी टीव्ही, हजार रुपये राेख, घड्याळ, माेबाइल असा एकूण २३ हजार रुपयांचा एेवज लंपास केला. याप्रकरणी रामानंदनगर पाेलिस ठाण्यात चाेरीचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. तपास हवालदार निकुंभ करीत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...