आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक दिवसाआड घरफोडी; चोरीची पद्धतही वेगळी, पोलिसदेखील चक्रावले; एवढे चोरटे आले कुठून?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- आहुजानगरात गुरुवारी मध्यरात्री झालेल्या नऊ घरफोड्यांप्रकरणी पोलिसांनी शनिवारी पाच संशयितांना ताब्यात घेतले. शहरात गेल्या आठवडाभरात चोरट्यांनी 15 ठिकाणी घरफोड्या करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. निर्जन ठिकाणी आणि शहराबाहेर असलेल्या कॉलन्यांतील घरांना हे चोरटे लक्ष्य करीत आहेत. त्यातील एक विशेष बाब म्हणजे, एक दिवसाआड चो-या होत आहेत. प्रत्येक वेळी चोरीची पद्धतही वेगळी आहे. त्यामुळे पोलिस चक्रावले आहेत.
27 ऑक्‍टोबरला दादावाडी परिसर, मू.जे.महाविद्यालयासमोर आणि रायासोनीनगरात पाच ठिकाणी चोरी करताना ज्या बंद घरात चोरी करायची आहे, त्याच्या आजूबाजूला असलेल्या घरांच्या दरवाजाची बाहेरची कडी लावून घरफोड्या केल्या. चोरी करताना चोरट्यांनी स्विफ्ट डिझायर गाडी वापरल्याचेही समोर आले आहे. त्यानंतर 29 ऑक्‍टोबरला रायसोनीनगरातील एका घरात घुसून घरातील व्यक्तींना लाकडी दांड्याचा धाक दाखवून जबरी चोरी केली. तसेच 30 ऑक्‍टोबरला रात्री आहुजानगर परिसरातील बंद घरे कडी तोडून फोडली. त्यामुळे चोरट्यांनी वेगवेगळी मोडस ऑपपरेंडी वापरली आहे.
गेल्या सहा दिवसांत लागोपाठ 15 घरफोड्या झाल्या आहेत. रविवारी मध्यरात्री पाच ठिकाणी घरफोडी केली होती. त्यात चोरटे स्विफ्ट गाडीतून आले. त्यांचा तपास मात्र अद्यापही लागलेला नाही. मंगळवारी रात्री रायसोनीनगरात चड्डी -बनियान घातलेल्या चोरट्यांनी घरात घुसून जबरी लूट केल्यानंतर पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यापैकी दोघे पोलिस कोठडीत आहेत. त्यात एक विशेष बाब म्हणजे, दर एक दिवसाआड घरफोडी होत आहे चाेरीची पद्धतही वेगळी आहे. चोरी केल्यानंतर पसार होण्यासाठी मोकळी जागा आहे अशाच भागांमध्ये चोऱ्या होत आहेत. मात्र, कधी चारचाकीतून, तर कधी चड्डी-बनियान घालून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, पोलिसांच्या तपासाला दिशा मिळण्यापूर्वीच चोरटे हात धुऊन घेत अाहेत. त्यामुळे पोलिसांना गोंधळात टाकणारे हे चोरटे कोण आहेत? त्यांची संख्या किती आहे? अाणि मुळात हे चोरटे शहरात आले कुठून? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
घरफोडीप्रकरणी आणखी ताब्यात
शहरातसध्या ज्या पद्धतीने चो-या केल्या जात आहेत त्या पद्धतीच्या चो-या यापूर्वी झाल्या असतील, तर त्यातील चोरांचा तपास पोलिस घेत आहेत. शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने जणांना ताब्यात घेतले आहे. त्यात गणपतीनगरात 27 लाखांची घरफोडी करणा-या भोला बावरीचाही समावेश अाहे.