आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंद्रप्रस्थनगरात चाेरट्यांची ‘दिवाळी’, ५२ हजारांचा एेवज लंपास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - भाऊबीजसाठी पत्नीला माहेरी साेडण्यासाठी गेलेल्या अजय घेंगट यांच्या इंद्रप्रस्थनगरातील बंद घरात चाेरट्यांनी घरफाेडी केली. यात त्यांनी कपाटात ठेवलेले ५२ हजार रुपये लंपास करून दिवाळी साजरी केली. ही घटना गुरुवार ते शुक्रवारदरम्यान घडली.

इंद्रप्रस्थनगरात प्रल्हाद जगन्नाथ पाटील यांच्या प्लॉट क्रमांक ११० मधील घरात केबल ऑपरेटर अजय घेंगट हे त्यांच्या पत्नी मुलासह राहतात. घेंगट गुरुवारी दुपारी वाजता भाऊबीजसाठी पत्नीला मुलांसह माहेरी रावेर येथे सोडण्यासाठी गेलेले होते. तेथून शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता ते घरी परतले. त्यावेळेस घराचा समोरच्या लोखंडी आतील लाकडी दरवाजाचे कुलूप गायब झाल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांना चाेरीचा संशय आल्याने त्यांनी तातडीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. घरामध्ये कॉटवर कपडे पडलेले कपाट उघडे दिसले. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना बाेलावून या प्रकाराविषयी विचारपूस केली. मात्र, या प्रकाराविषयी काहीच माहिती नसल्याचे शेजाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली. थाेड्या वेळानंतर घटनास्थळी पाेलिस श्वान पथकासह अाले.

कपाटाच्या चाव्या शर्टच्या खिशात
चोरट्यांनी घराच्या दोन्ही दरवाजांचे कुलूपही चोरून नेले आहे. समोरच्या रूममधील कपाट उघडून त्यामध्ये शोधाशोध केली. त्यातील कपड्यांची वस्तूंची घरात फेकाफेक केली. घेंगट यांनी त्या कपाटात किचनमधील कपाटाच्या चाव्या ठेवलेल्या होत्या. त्या चाव्यांच्या आधारे चोरट्यांनी किचनमधील कपाट उघडले. त्यामधील कपडे वस्तू घरात फेकल्या. त्यामध्ये ठेवलेले ५२ हजार रुपये चोरून नेल्याचे घेंगट यांनी सांगितले. परंतु, दागिने इतर वस्तू चोरट्यांच्या हाती लागले नाही. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या माहितीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.