आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

51 यात्रेकरूंना वाचविणारा बसचालक सलीम शेख खान्देशाच्या मातीतला, देशभरातून कौतूकाची थाप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहादूर सलीम शेख हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील पिंपरखेड येथील आहे. - Divya Marathi
बहादूर सलीम शेख हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील पिंपरखेड येथील आहे.
भडगाव (जि. जळगाव)  - अमरनाथ यात्रेेत बसवर हल्ला झाल्यानंतर स्वत:च्या जीवाची पर्वा न करता ४० प्रवाशांचे प्राण वाचविणाऱ्या जिगरबाज सलीम शेख नामक बसचालकाचे देशभरात कौतुक होत अाहे. जम्मू-काश्मीर सरकारने तर त्याला तीन लाखांचे बक्षीसही जाहीर केले अाहे. हा बहाद्दर सलीम  मूळचा पिंपरखेड (ता. भडगाव, जि. जळगाव, खान्देश) येथील रहिवासी असून ताे सध्या गुजरातमध्ये राहत असल्याची माहिती अाता समाेर अाली अाहे.  
 
गुजराथ येथून (जीजे ०९.झेड ९९७६)  या क्रमांकाच्या खासगी बसने प्रवासी अमरनाथ यात्रेकडे रवाना झाले हाेते. जम्मू-काश्मीरजवळील अनंतनागजवळ अतिरेक्यांनी साेमवारी रात्री या बसला रस्त्यावर अडवून बेछूट गाेेळीबार केला. यात बसमधील सात भाविकांचा मृत्यू झाला तर १५ हून अधिक भाविक जखमी झाले. यात बसचालक सलीम गफूर शेख हादेखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू अाहेत. सलीम याने जखमी अवस्थेतही अतिरेक्यांना न जुमानता बसचे स्टेअरिंग साेडले नाही. अतिरेक्यांनी अंदाधुंद गाेळीबार सुरू करताच त्याने बसचा दरवाजा तातडीने बंद केला. त्यामुळे अतिरेक्यांना बसमध्ये प्रवेश करता अाला नाही. मात्र त्यांनी  बसवर गाेळीबार सुरूच ठेवला. त्यात सात भाविक ठार झाले. अशाही स्थितीत न डगमगता सलीम याने बस दाेन किलाेमीटरपर्यंत सुसाट नेली. गाेळ्यांच्या अावाजाने सुरक्षा दल व तेथील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. ते रस्त्यावर दिसल्यावरच सलीम याने बस थांबवत अापबीती कथन केली. त्यानंतर सुरक्षा दल हल्लेखाेर अतिरेक्यांना शाेधण्यासाठी रवाना झाले. सलीमच्या या धाडसामुळे  जवळपास ३५ ते ४० प्रवाशांचे प्राण वाचले. त्याचे देशभरात काैतुक हाेत अाहे.
 
धाडसाची गावात चर्चा  
सलीम हा काही काळ भडगाव तालुक्यातही खासगी वाहन चालक म्हणून हाेता. नंतर त्याचे संपूर्ण कुटुंब गुजरातमध्ये स्थायिक झाले. त्याच्या धाडसाची चर्चा भडगाव तालुक्यासह त्याच्या गावातही अाहे. मंगळवारी त्याच्या गावातील घरी दिवसभर अनेक लोक भेट देत हाेते. त्याच्या अात्या बहिणीने सलीमच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. 
 
सलीमच्या गुजरातमधील कुटुंबीयांनीही प्रसार माध्यमांशी बाेलताना त्याने केलेल्या कामाचे ताेंडभरून काैतूक केले अाहे.
 
शाैर्य पुरस्कारासाठी शिफारस करणार
अमरनाथ यात्रेकरूंना वाचविल्यामुळे जम्ू- काश्मीर सरकारने सलीमला तीन लाखांचे पारितोषिक जाहीर केले अाहे. गुजरात सरकारनेही त्याला बक्षीस जाहीर करून शाैर्य पुरस्कारासाठी त्याच्या नावाची शिफारस करणार असल्याची माहिती गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी दिली.  
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सलीमने माध्यमांकडे केल्या भावना व्यक्त
 
बातम्या आणखी आहेत...