आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुने बसस्थानक ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठापर्यंत आजपासून दररोज धावणार महामंडळाची बस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या अनेक दिवसांच्या मागणीनंतर जुने बसस्थानक ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या बससेवेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. त्यानुसार दररोज सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत चार विशेष बस पासधारक विद्यार्थ्यांसाठी असतील. या सेवेचा शुभारंभ गुरुवारी सकाळी ८.३० वाजता कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्याहस्ते होणार आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जा-ये करण्यासाठी बससेवा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत असे. यामुळे मुलांचा वेळ पैशांचा अपव्यय व्हायचा, याबाबत वारंवार तक्रारी करूनही बससेवा सुरू होत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असे. 
 
अखेर कुलगुरूपदी नियुक्त झाल्यानंतर प्रा. पी. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याचा मनोदय व्यक्त करून त्यासाठी प्रयत्न सुरू केले. याबाबत एसटी महामंडळाने सकारात्मकता दर्शवत पासधारकांसाठी विद्यापीठात बससेवा सुरू करण्याचे मान्य केले. त्यानुसार गुरुवारपासून दररोज सकाळी ८.३० ते ९.३० या वेळेत चार विशेष बस पासधारक विद्यार्थ्यांसाठी सुरू होत आहे. या सेवेमुळे विद्यापीठात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

विद्यार्थ्यांसाठी दरमहा २६० रुपये शुल्क पाससाठी आकारले जाणार आहे. पहिल्या महिन्यात ३०० रुपये आकारले जातील. बसमध्ये केवळ पासधारक विद्यार्थ्यांनाच बसता येईल. पहिल्या टप्प्यात एकूण २०० विद्यार्थ्यांसाठी चार बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या जाणार आहेत. एका बसमध्ये ५० पासधारक विद्यार्थी राहतील. गुरुवारी सकाळी ८.३० वाजता कुलगुरू प्रा.पी.पी.पाटील यांच्या उपस्थितीत पहिली बस जुन्या बसस्थानकापासून रवाना होणार आहे. या पहिल्या बसने कुलगुरू हे स्वत: विद्यापीठापर्यंत प्रवास करणार आहेत.