आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजबजलेल्या मॉर्डन रोडवर शुकशुकाट; अकाली पावसाने बाजारावर संक्रात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - शहरात सलग तीन दिवस बेमोसमी पाऊस कोसळला. यामुळे दिवसाचे कमाल तापमान चक्क १९ अंशांपर्यंत घसरून गारठा वाढला आहे. या गारठ्यामुळे नागरिक कामाव्यतिरिक्त घराबाहेर निघत नाहीत. परिणामी मुख्य बाजारपेठेतदेखील शुकशुकाट असून मोठ्या दुकानांमध्ये ग्राहकांअभावी मंदीचा अनुभव येत आहे.
शहरात बाजारपेठेतील दुकाने एरव्ही सकाळी १० वाजता उघडतात. शनिवारी मात्र दुपारी १२ वाजेपर्यंत अनेक दुकाने बंद होती. दररोज सकाळी वाजेपासून भाजी बाजारात गर्दी होते. शनिवारी ही वर्दळ अत्यंत विरळ होती. चहाचे स्टॉल आणि उबदार कपडे विक्रीच्या दुकानांवर मात्र ग्राहकांची गर्दी वाढली होती.

उघडीपनंतरप्रवासी वाढले
शनिवारी दुपारनंतर वातावरण बऱ्यापैकी निरभ्र असल्याने बसस्थानकात प्रवासी संख्या वाढली होती. पावसामुळे तालुक्यासह कोणत्याही लांब पल्ल्याच्या बसफेऱ्यांवर परिणाम झाला नसल्याचे बसस्थानकाच्या सूत्रांनी सांगितले.

रस्त्यांचे काम लांबणीवर
नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात शहरातील एमआयडीसीमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण सुरू होणे नियोजित होते. अचानक आलेल्या बेमोसमी पावसामुळे हे काम आता लांबणीवर पडणार आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यानंतरच डांबरीकरणाचे काम हाती घेण्यात येईल. बेमोसमी पावसाने पुन्हा हजेरी लावल्यास हे वेळापत्रकदेखील िवस्कळीत होऊ शकते.
धान्याची आवक शून्य
पावसामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये धान्य विक्रीसाठी आणणे बंद केले आहे. जानेवारीपासून किलोभर धान्यही िवक्रीस आले नाही. केवळ उपलब्ध ज्वारी आिण मक्याचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी व्यापाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. ताडपत्री झाकून देखील जमीन समतल पोत्यांमधील धान्य खराब झाल्याचे व्यापारी लक्ष्मीकांत हेडा यांनी सांगितले.
१०.६ मि.मी. पाऊस
शहरात आणि जानेवारी या दोन दिवसात १०.६ मि.मी.पावसाची नोंद झाली. पावसामुळे तालुक्यातील तळवेल परिसरात भाजीपाला पिकाचे देखील नुकसान झाले. यापूर्वीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू असतानाच पुन्हा आपत्ती कोसळली आहे.
ओपीडी दुप्पटीने वाढली
वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने दवाखान्यांमधील रुग्णसंख्या दुप्पटीने वाढली आहे. इतरवेळी नगरपालिका रुग्णालयात केवळ ७० ते ८५ ओपीडी असते. सध्या हा आकडा १५० पेक्षा जास्त आहे. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती फलटणकर यांनी केले.
हतनूरमधून प्रथमच विसर्ग
हतनूर धरण बेमोसमी पावसाने १०० टक्के भरले. शनिवारी दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडून ९६ क्युमेक्स प्रतिसेकंद वेगाने विसर्ग करण्यात आला. २९ डिसेंबर रोजी ३६८.२० दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९२ टक्के असलेला साठा शनिवारी ३८८.८० दशलक्ष घनमीटर (१०० टक्के) होता. बेमोसमी पावसाने धरण भरून विसर्ग होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात आले.
सीसीआय कापूस खरेदी थांबली
पावसामुळे आर्द्रता वाढली आहे. सीसीआयच्या केंद्रात १३ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेच्या कापसाची खरेदी होत नाही. सध्या ढगाळ वातावरण आणि आर्द्रता वाढती असल्याने जानेवारीपासून सीसीआयची कापूस खरेदी बंद करण्यात आली आहे. दोन दिवसांनंतर कापूस खरेदीला पूर्ववत सुरुवात होईल. प्रतििक्वंटल हजार ५० रुपयांचा भाव असेल, अशी माहिती साई कोटेक्सचे संचालक संतोष त्र्यंबक चौधरी यांनी दिली.