आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन तास ताटकळले लांब पल्ल्याचे प्रवासी; वादामुळे बसेस खाेळंबल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - येथील मध्यवर्ती बसस्थानकात मध्य प्रदेशच्या बसेसना थांबा घ्यायला परवानगी नाकारल्यामुळे सोमवारी पहिल्याच दिवशी गोंधळ उडाला. धुळे आगाराने प्रवाशांना पूर्वकल्पना देता हा तुघलकी निर्णय लादल्याचा आरोप प्रवाशांनी केला. तर मध्य प्रदेशच्या बसचालकांनी हाच कित्ता गिरवून महामंडळावर खापर फोडले. एसटी महामंडळाने मात्र वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचे कारण पुढे केले. या गोंधळामुळे तीन तासांपर्यंत मध्य प्रदेशची वाहने आगारात थांबून होती. त्याचबराेबर प्रवाशीही तीन तास ताटकळत उभे हाेते.
धुळे अागाराने सोमवारपासून मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाहनांना मध्यवर्ती बस आगारात प्रवेश नाकारला आहे. मध्य प्रदेशच्या वाहनांनी देवपुरातील नवनिर्मित बसस्थानकापर्यंत यावे, अशी सूचना करण्यात आली आहे; परंतु या नियमामुळे अनभिज्ञ असलेल्या अनेक प्रवाशांनी सकाळी नाराजी व्यक्त केली. सकाळपासून सेंधव्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची प्रवासी प्रतीक्षा करत होते. मध्य प्रदेशातील बसेसप्रमाणेच नंदुरबार, शिरपूर तसेच शिंदखेड्यामार्गे येणाऱ्या बसेसनाही हा नियम लावण्यात आला आहे. केवळ लांब पल्ल्याच्या बसेस धुळे बस आगारात येऊ शकणार आहेत. मात्र यातही सेंधवा येथून शिर्डी अथवा इतर मार्गे जाणाऱ्या बसेसना आगारात प्रवेश नाकारण्यात आला आहे. एकीकडे धुळे बस आगारात प्रवासी सेंधव्याकडे जाणाऱ्या बसेसची प्रतीक्षा करत होते. तर दुसरीकडे सेंधव्याहून येणाऱ्या बसेसना आगारात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे सध्या विस्तारीकरण होत असलेल्या जागेवर या बसेस थांबून होत्या. सुमारे अडीच ते तीन तास काही बसचालकांनी आगाराबाहेर वाहने नेली नाही. त्यामुळे सेंधवा-शिर्डी अशा लांब पल्ल्याच्या बसेसमधील प्रवाशीही यामुळे अडकून पडले. धुळे एसटी महामंडळ आडमुठे धोरण घेत आहेत. त्यामुळे प्रवासी आमच्याशी वाद घालतात. बस अागारात यायचे नाही तर इतर प्रवासी बसवायचे कुठून, असा प्रश्न त्यांनी विचारला. दरम्यान, माहिती मिळाल्यानंतर डेपो मॅनेजर भगवान जगनोर इतर अधिकारी दाखल झाले; परंतु प्रवासी मध्य प्रदेश बसचालक प्रवाशांच्या प्रश्नांची ते सोडवणूक करू शकले नाही. त्यानंतर दुपारी १२ वाजेच्या सुमारास सेंधव्याकडील वाहने आगारातून बाहेर पडली; परंतु मुख्य प्रश्नावर मात्र तोडगा निघाला नव्हता. दरम्यान दिवसभरात धुळे बस आगारातून सुमारे १५० बसेस धावतात. तर रोज सरासरी २३ बसेस सेंधवा येथून येतात.

दोन दिवसांपूर्वी दिले पत्र
^मध्यप्रदेश बसचालकांना दोन दिवसांपूर्वीच पत्र देऊन याबाबत पूर्वकल्पना दिली होती. त्यामुळे त्यांनी स्वत:हून वाहन आगारापर्यंत आणायला नको होते. आगारात वाहतुकीचा खोळंबा होतो. प्रवाशांना माहिती झाल्यावर ते स्वत:हून अवश्य बदल करतील. मध्य प्रदेशचे चालक मुद्दाम वाद वाढवत आहेत. यातून काहीही साध्य होणार नाही. -भगवानजगनोर, डेपो मॅनेजर

चौकशी कक्ष शोभेचे बाहुले
सेंधव्याकडे जाणाऱ्या बसेसची प्रवासी वाट पाहत होते. त्यासाठी काही प्रवासी थेट चौकशी कक्षापर्यंतही गेले; परंतु संबंधित कर्मचाऱ्यांनी नेहमीप्रमाणे उत्तर देण्याचे टाळले. शिवाय प्रवाशांना उद्धटपणे वागणूक दिली. याबाबत अधिकारी जगनोर यांच्याशी संपर्क साधला असता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. प्रवाशांनी लेखी तक्रार द्यावी, अशी सूचना केली आहे.

अधिकाऱ्याने डावलले
}प्रवासी : मी मोराण्याला राहतो. सेंधवा जायचे आहे. अाता उशीर झाला. मध्यरात्री बारा वाजेपर्यंत शहरात आल्यावर गावी कसा जाऊ?
{ अधिकारी : देवपूर बसस्थानक नाही तर शिवतीर्थ चौकात उतरा, तेथून बसस्थानकात या.
} प्रवासी : मध्यरात्रीची वेळी, चोरट्यांनी लुटले तर काय कराल?
{ अधिकारी : अहो, जवळच पोलिस ठाणे आहे. काहीही होणार नाही.
} प्रवासी : एवढी पायपीट करून रात्री बस हुकली तर?
{ अधिकारी : शिवतीर्थापासून फार अंतर नाही. हवे तर रिक्षा करा.
} प्रवासी : हा भुर्दंड आम्ही का सोसायचा?
{ अधिकारी : तुम्ही त्यांच्या विचाराने बाेलू नका.
बातम्या आणखी आहेत...