आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौशल्य विकासासाठीच व्यवसाय शिक्षणाची गरज, डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘व्यवसाय शिक्षण संवाद’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कौशल्यविकासासाठी व्यवसाय शिक्षण निर्माण करण्यात आले आहे. या शिक्षणातूनच तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना नोकरी बरोबरच व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर विविध निर्णय घेण्यात येतील, असे प्रतिपादन शिक्षक आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केले. डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित व्यवसाय शिक्षण संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन व्यवसाय शिक्षण कर्मचारी संघटनेतर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य मेधा जोशी, शिवाजी शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर आमदार उन्मेश पाटील, कर्मचारी महासंघाचे सचिव प्रा. विद्याधर गोडबोले, कार्याध्यक्ष शिवाजीराव बडंगर, खजिनदार विजयसिंग सिसोदिया, निवृत्ती देवकर, शैलेश माने, लेवा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, व्यवसाय शिक्षण निरीक्षक डी.एम. महाजन, प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, प्रा. दिलीप बोंडे, चंद्रकांत बऱ्हाटे, एन.एस. पाटील उपस्थित होते.
अर्धवट अध्यादेशाचा मनस्ताप
आमदारडॉ. सुधीर तांबे यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवत या क्षेत्राकडे पाहण्याचा प्रशासनाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी संघटित प्रतिकार करण्याचे अावाहन केले. प्रशासनाकडून काढल्या जाणाऱ्या अर्धवट अध्यादेशाचा शिक्षकांना सहन करावा लागणारा मनस्ताप यामुळे निर्माण होणाऱ्या प्रशासकीय अडचणीवरही मार्गदर्शन केले. यासह विनाअनुदानित व्यवसाय मार्गदर्शन विद्यालय, शिक्षकांची वेतनश्रेणी, सुधारित अभ्यासक्रमाविषयी नवीन निर्णय घेण्याचेही आश्वासन दिले.
प्रशासनाला बैलाची उपमा
आमदारसुरेश भोळे यांनी प्रशासन म्हणजे प्रचंड शक्तीचा बैल आहे, या बैलाशी जुळवून घेत नियंत्रण करता आले पाहिजे. ते सततच्या पाठपुराव्यानेच शक्य असल्याने संघटितपणे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यात येतील, असेही ते म्हणाले. आमदार उन्मेश पाटील यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. संघटनेचे अध्यक्ष मनीष बाविस्कर यांनी शिक्षकांच्या चुकीच्या अध्यादेशामुळे प्रशासनाविषयी उदासीनता निर्माण झाली असून याविरोधात शिक्षकांनी संघटित होण्याची गरजही व्यक्त केली.