आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पावसाने धुतली मंदीची मरगळ, अाॅटाेमाेबाइल, स्मार्टफाेन, इलेक्ट्राॅनिक, कापड बाजारामध्ये ‘धूम’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गतवर्षाच्या दुष्काळी स्थितीमुळे अातापर्यंत बाजारपेठेवर असलेली मरगळ मनसाेक्त बरसलेल्या पावसाने धुतली गेली अाहे. नवरात्र अाणि दसऱ्यानिमित्त बाजारपेठेत चांगलाच उत्साह संचारला अाहे. दसरा मुहूर्ताच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज झाली असून चारचाकी, स्मार्ट फाेन, लॅपटाॅप, टॅब, एलईडी टीव्ही, इंडक्शन कुकरसह अारअाे कंपन्यांच्या अाॅफर्सने जळगावकरांचे लक्ष वेधून घेतले अाहे. दसऱ्याचा मुहूर्त जवळ आल्यामुळे नवरात्राेत्सवातील खरेदीचा प्रतिसाद बाजारपेठेत उत्साह निर्माण करणारा ठरला अाहे. पावसाअभावी झाकला गेलेला बाजार पुन्हा खुलला अाहे. मुहूर्तावर चारचाकी गाडी खरेदीकडे असलेला जळगावकरांचा काैल कायम असल्याचे दिसून येत अाहे.
वाढत्या मागणीमुळे प्रत्यक्ष गाडी उपलब्ध नसली तरी मुहूर्तावर बुकिंगसाठी ग्राहक सरसावले अाहेत. गाड्यांवर असलेली कॅश डिस्काउंट, कुपन, इन्शुरन्स फ्री, भेटवस्तू यासारख्या अाॅफर्स ग्राहकांकडून पदरात पाडून घेतल्या जात अाहेत. चारचाकी, दुचाकीची दसऱ्यासाठी बुकिंगला गर्दी वाढली अाहे. स्मार्ट फाेन, अारअाे वाॅटर प्युरिफायर, फ्रीज, एलईडी टीव्ही, मायक्राेव्हेवला विशेष मागणी असून कापड बाजारपेठेतही गर्दी वाढली अाहे. फुले मार्केटमध्ये हाेलसेल, रेडिमेड कपड्यांची अायात वाढली अाहे.

अाॅटाेमाेबाइल मार्केटमध्ये उत्साह
दसऱ्याच्या मुहूर्तासाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत अाहे. दुचाकी वाहन बाजारात या सिजनमध्ये स्टाॅक वाढवण्यात अाला अाहे. ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर तत्काळ गाडी उपलब्ध करून देण्यावर विक्रेत्यांचा भर अाहे. शहरातील विविध दुचाकींची सातपेक्षा अधिक माेठे शाेरूम अाहेत.
स्मार्ट फाेनची बाजारात चलती
अॅन्ड्राइड माेबाइलच्या अाॅफर्सने इलेक्ट्रानिक बाजारात धूम केली अाहे. स्मार्ट फाेनसाठी ग्राहकांनी अाणि कंपन्यांनी नवरात्र, दसरा हा मुहूर्त पाहून अाॅफर्स दिल्या अाहेत. स्मार्ट फाेन खरेदीवर कॅश डिस्काऊंट देण्यावरही काही कंपन्यांचा भर अाहे. ग्राहकांना विविध अॅप्स, मेमरी कार्ड, भेटवस्तू यासारख्या याेजना विक्रेत्यांकडे उपलब्ध अाहेत. तर सर्वाधिक प्रतिसाद अाॅनलाइन खरेदीवर अाॅफर्सला मिळत अाहे.
बातम्या आणखी आहेत...