आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव वाहनाचा पाठलाग करून 14 पोते गुटखा जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव : वावडदा-वडली रस्त्यावर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भरधाव जात असलेल्या वाहनाला एमआयडीसी पोलिसांनी अडवून तपासणी केली. यात सुमारे लाख ३४ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा, पान मसाला अाणि सुगंधी तंबाखू सापडली. 
 
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी प्रकाश पवार बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास वडली येथे समन्स, वॉरंट बजावणीसाठी जात हाेते. त्यांना वावडदा ते वडली दरम्यान भरधाव जाणारे वाहन (एम.एच. १९ बी एम ००५१) संशय अाला.
 
त्या वाहनाचा काही अंतरापर्यंत पाठलाग करून अडवले. वाहनाची तपासणी केली असता १८ पोते माल ठेवला होता.ते पाेते उघडून बघितल्यानंतर त्यातील १४ पाेत्यांमध्ये गुटखा, पान मसाला सुंगधी तंबाखू आढळून आली.
 
 पाेलिस कर्मचारी प्रकाश पाटील यांनी त्याला पकडून ठेवून त्यांचे सहकारी सुशील मगरे, जितेंद्र राठोड यांना बोलावून घेतले. त्यांनी वाहनचालक विजय अशरफीलाल मिश्रा याला ताब्यात घेऊन एमआयडीसी पाेलिस ठाण्यात अाणले.
 
त्यानंतर जप्त केलेल्या मालाची नोंद घेत अन्न औषध विभागाला पाचारण करण्यात आले.अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या पथकाने मालासह वाहन ताब्यात घेतल्याचे एस.एस. देवरे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...