आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचे विद्यार्थी जपानला चमकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जपानयेथील तोकूशिमा विद्यापीठ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत समर स्कूलसाठी गेलेले उमविचे पाच विद्यार्थी नुकतेच जपानहून परतले. या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
करारांतर्गत विद्यापीठाच्या जैव तंत्रज्ञान प्रशाळेचा अनुज चौधरी, रसायन तंत्रसंस्थेचा ऋषिकेश देसले हर्षल पाटील, देवकर अिभयांत्रिकेचा अनिलसिंग गौर आिण एसएसबीटी अभियांत्रिकीचा कुणाल गिरासे हे पाच विद्यार्थी २१ जुलै रोजी जपानला गेले होते.
या समर स्कूलमध्ये चीन, फ्रान्स, थायलंड, मलेशिया, तैवान, अमेरिका, कॅनडा, जपान, दक्षिण कोरिया व्हिएतनाम या देशांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. अनुज चौधरी याच्या ‘ग्लोबलायझेशन अॅण्ड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडियन हायर एज्युकेशन’ या विषयावर केलेल्या सादरीकरणाला पहिले पारितोषिक मिळाले.

तर देसले याने ‘कल्चरल इंडिया पिनॅकल ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन’ या विषयावर सादरीकरण केलेे. या विद्यार्थ्यांना डॉ.पंकज कोईनकर, डॉ.तोशिहोरो मोरिगा, प्रा.मुराकामी, प्रा.स्टिफन कारूनगारू आिण प्रा.याशुहिको कावामुरा यांनी मार्गदर्शन केले.