आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CA CPT's All Subject Students Should Pass Necessary

विद्यार्थ्यांना आता सीए-सीपीटीचे सर्व विषय उत्तीर्ण होणे आवश्यक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सीए-सीपीटी (कॉमन प्रोफेशिएन्सी टेस्ट) देणे आता पहिल्यापेक्षा अधिक कठीण होणार आहे. कारण आता एक किंवा दोन विषयात स्कोअर करणार्‍या विद्यार्थ्यांची निवड होणे शक्य नाही, तर प्रवेश परीक्षेच्या चारही विषयांमध्ये कमीत कमी 30 टक्के गुण मिळवणे अनिवार्य होणार आहे. तसेच या चारही विषयांचे अँग्रिगेट मिळून कमीत कमी 50 टक्के गुण असणेही आवश्यक आहे. दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय)तर्फे 16 जून रोजी आयोजित करण्यात येणार्‍या सीए-सीपीटीपासून हा नवीन नियम लागू होणार आहे. विद्यार्थी आपल्या आवडत्या दोनच विषयांमध्ये अधिक मार्क्‍स मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात. तसेच एखाद्या विषयाला पूर्णपणे सोडून देत होते. त्यामुळे हा बदल करण्यात आला असल्याने आता विद्यार्थ्यांना चारही पेपर सोडवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

दोन तासांची वाढीव वेळ
सीए-सीपीटीमध्ये पहिल्यांदाच शारीरिक व्यंग असलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सुविधा देण्यात आली आहे. 50 टक्क्यांपर्यंत विकलांग असलेल्या विद्यार्थ्यांना सकाळी 10.30 ते दुपारी 12.30पर्यंत आयोजित वेळेत एका तासाची वाढीव मुदत देण्यात आली आहे. तसेच 2 ते 4 वाजेपर्यंत चालणार्‍या पेपरसाठीही एका तासाचा वाढीव वेळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी 50 टक्क्यांपेक्षा कमी विकलांग आहेत, त्यांना अर्धा-अर्धा तासाची वाढीव मुदत मिळणार आहे; परंतु ही सुविधा उपभोगण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना नवी दिल्ली येथील मुख्य कार्यालयाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे.
ऑनलाइनचा लाभ
सीए-सीपीटीसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारात अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. जे विद्यार्थी आयसीएआय किंवा रिजनल ब्रॅँचमधून फॉर्म घेतील त्यांना 1000 रुपये जमा करावे लागतील; मात्र जे विद्यार्थी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आयसीएआय डॉट ओआरजी’ या वेबसाइटवरून ऑनलाइन अर्ज करतील त्यांना 500 रुपये फी अदा करावी लागेल. ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी ही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आर्थिक फायदा होणार आहे.
असे आहे वेळापत्रक
3 एप्रिल : ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करण्यास सुरुवात
24 एप्रिल : अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत
16 जून : परीक्षा
सकाळी 10.30 ते 12.30
फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग
मर्कंटाइल लॉ
दुपारी 2 ते 4
जनरल इकॉनॉमिक्स
क्वॉन्टिटेटिव्ह अँप्टिट्यूड
एकूण गुण : 200
किमान अँग्रिगेट गुण 100 : 50 टक्के
यासाठी बदल
परीक्षार्थींनी प्रत्येक विषयाला समान न्याय द्यावा, या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. आतापर्यंत विद्यार्थी ज्या विषयात पकड असायची त्याच विषयात अधिक गुण प्राप्त करत होते. त्याचबरोबर अपंग विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी अधिक वेळ देण्याची सोयही फायदेशीर ठरणार आहे. अभय छाजेड, चेअरपर्सन, रिजनल कौन्सिल मेंबर