आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो आश्चर्यम्! सन 2013 च्या कॅलेंडरमध्ये सर्व साम्य सन 1991 प्रमाणेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- हिंदी भाषेमध्ये एक म्हण आहे, ‘गुजरा हुआ वक्त वापस नहीं आता’ पण आता ‘कौन कहता है कि गुजरा हुआ वक्त वापस नही आता ?’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. असे म्हणण्याचे कारण दडलेय ते सन 2013 च्या कॅलेंडरमध्ये. कारण, हेच कॅलेंडर 22 वर्षांपूर्वी, म्हणजे सन 1991 मध्ये होते. 1991 जणू आरसाच आहे सन 2013.

‘महाभारत’ मालिकेत सुरुवातीलाच ‘मैं काल हू..’ असा धीरगंभीर आवाज ऐकू येतो. काळाचा महिमा स्पष्ट करताना, एकदा गेल्यावर पुन्हा येत नाही तो फक्त काळच असा त्याचा मतितार्थ आहे. पण, खुद्द कालपुरुषालाही प्रश्न पडावा इतके साम्य सन 2013 आणि सन 1991 या दोन्ही वर्षांच्या कॅलेंडरमध्ये आहे. केवळ कॅलेंडरच नाही, तर अनेक महत्त्वाच्या घडामोडीही ‘सेम टू सेम’ आहेत. या विशेष योगायोगाची माहिती देणारे विविध लघुसंदेश वॉटस्अँपसह मोबाइलवरही फिरू लागले आहेत.

सर्व काही पुन्हा तसेच
देश-परदेशातील अनेक घडामोडींचा विचार करता सन 1991 मधील अनेक बाबींची 2013 मध्ये पुनरावृत्ती होत आहे. देशाचा आर्थिक विकासदर पुन्हा पाच टक्क्यांवर येणे, बीसीसीआयमध्ये दालमियांचा पुनप्र्रवेश, इन्फोसिसमध्ये नारायणमूर्तींचे पुनरागमन, पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी पुन्हा नवाझ शरीफ यांची निवड आदी दाखले यासाठी दिले जात आहेत.

अहो आश्चर्यम्! सणवारही तंतोतंत
सन 2013 च्या कॅलेंडरमध्ये असलेल्या तारखा, वार आणि सणवार तंतोतंत सन 1991 प्रमाणेच आहेत. याशिवाय, सन 2013 मधील 4 / 4/ 2013, 6 / 6/ 2013, 8 / 8/ 2013, 10 / 10/ 2013, 12/ 12/ 2013 या सर्व ‘मॅजिक’ तारखांना गुरुवार आला आहे.