आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेलिफोन, मोबाइल, इंटरनेट सेवा अाजारी; आवाज न येणे, कॉल ड्रॉप होणे नित्याचेच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात गेल्या आठवडाभरापासून मोबाइल, लॅण्डलाइन तसेच इंटरनेट सेवेत चांगलाच व्यत्यय येत आहे. यात आवाज येणे, कॉल ड्रॉप होणे, फोन लागणे, इंटरनेट सुरू होणे यासारखे प्रकार घडत आहे. शहरात काही खाजगी कंपन्यांनी फोर जी केबल टाकल्याचा गाजावाजा झाला, पण थ्री जीची सेवा व्यवस्थित नसेल तर फोर जी सेवेची काय अपेक्षा ठेवणार? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

पावसाळ्यात वीज गूल होण्याचे प्रमाण जसे वाढले, तसेच मोबाइल, लॅण्डलाइन इंटरनेट सेवा खंडित होण्याचे प्रमाणही वाढले. हा प्रकार सर्वच कंपन्यांच्या सेवेत झाला आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीशी मोबाइल, लॅण्डलाइनवरून संवाद साधने कठीण जात आहे. या समस्येबाबत कंपन्यांच्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर आज, उद्या सेवा सुरळीत होईल अशी उत्तरे नागरिकांना ऐकावी लागत आहे. प्रत्यक्षात आठवडाभरापासून सेवा सुधारलेली नाही. मोबाइल नेटवर्कची सेवा देणाऱ्या कंपन्यांनी कमी टॉवरवर जास्त वापरकर्त्यांचा भार टाकल्यामुळे अशी समस्या समोर येत आहे.
डिशटीव्हीची सेवा खंडित
शहरातदोन महिन्यांपासून खासगी कंपन्यांनी फाेर जी नेटवर्क सेवा सुरू केली आहे. पण स्पीड मात्र थ्री जीप्रमाणेच मिळत आहे. वीज, वादळाच्या वेळी तर थ्री जीचा स्पीडसुद्धा टू जीप्रमाणे चालतो. त्यामुळे मोबाइलवरून इंटरनेट सर्फिंग करणेही कंटाळवाणे बनले आहे. तसेच वादळ, वारा सुरू होताच डिश टीव्हीद्वारे पुरवली जाणारी प्रक्षेपण सेवाही खंडित होत आहे.
शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेवरही परिणाम
बीएसएनएलची इंटरनेटसेवाही काही दिवसांपासून कोलमडत आहे. यामुळे व्यापारीवर्ग, विद्यार्थी व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या प्रवेशप्रक्रियेवरही परिणाम होत आहे. सर्वाधिक ग्राहक असल्याचा दावा बीएसएनएलकडून केला जातो. मात्र, त्या तुलनेत सुविधा मिळत नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
शहरातील बीएसएनएल कंपनीचे तीन डाटाकार्ड निकामी झाल्याने अन्य डाटाकार्डवर लोड वाढल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.औरंगाबाद येथून दोन दिवसांत नवीन डाटाकार्ड मागविण्यात आले असून, ते सुरू झाल्यावर सेवा पूर्ववत होईल, असे सहायक महाप्रबंधक व्ही.एस.सोनवणे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
बातम्या आणखी आहेत...