आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज वाटेल तिथे मला बोलवा, मी यायला तयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जळगावचा विकास झाला तर जिल्ह्याचा विकास होईल. त्यामुळे महापालिका आर्थिक संकटातून बाहेर निघणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनदरबारी कुठेही गरज भासल्यास मला केव्हाही बोलवा; मी यायला तयार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील यांनी दिले.

मनपाच्या मानाच्या गणपतीची आरती मंगळवारी डॉ.पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी त्यांनी महापालिकेला पुनर्वैभव प्राप्त होवो, अशी प्रार्थना केली. महापौर राखी सोनवणे, उपमहापौर सुनील महाजन आयुक्त संजय कापडणीस यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी त्यांनी सर्वपक्षीय नगरसेवकांशी हितगुज केले. तसेच खाविआचे नेते नितीन लढ्ढा यांनी महापालिकेच्या स्थितीबद्दल माहिती दिली. शासनदरबारी अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित आहेत. त्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे साकडे घातले. त्यावर आमदार पाटील यांनी सर्व नगरसेवक एकत्र येणे ही सकारात्मक बाब असल्याचे नमूद करत चांगल्या दिशेने वाटचाल सुरू आहे. हुडको जिल्हा बँकेच्या कर्जाबाबत एकरकमी परतफेडीचा प्रस्ताव तयार करून त्यातून मार्ग काढावा, असा सल्ला दिला. पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे महसूलमंत्रिपद आहे. त्यांनी ठरवले तर यातून मार्ग निघेल. त्यासाठी शेवटचा जोर लावा, असेही डॉ.पाटील म्हणाले.