आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cancel This Section Of The Central Railway Express 21

मध्य रेल्वे विभागातील २१ एक्स्प्रेस आज रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - इटारसी स्थानकावरील सेंट्रल कॅबिनला आग लागल्याने १७ जूनपासून रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी सलग १८व्या दिवशीही तब्बल २१ एक्स्प्रेस गाड्या मध्य रेल्वेने रद्द केल्या. परिणामी प्रवाशांचे हाल झाले.
मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरील १३ गाड्या शनिवारी रद्द करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने ११०६७ साकेत एक्स्प्रेस, ११०९३ महानगरी एक्स्प्रेस, १२१४१ राजेंद्रनगर एक्स्प्रेस, १२१४९ पुणे पटना एक्स्प्रेस, १२१५९ अमरावती जबलपूर सुपरफास्ट, १५०१७ काशी एक्स्प्रेस, १५६४५ गोवाहटी एक्स्प्रेस, १८६१० लोकमान्य एक्स्प्रेस, २२४५५ साईनगर शिर्डी कालका एक्स्प्रेस, ५११५७ भुसावळ इटारसी पॅसेंजर, ०१७११ मुंबई जबलपूर एक्स्प्रेस, १२१६७ वाराणसी एक्स्प्रेस, १२१८८ सीएसटीएम जबलपूर गरीब रथ एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
तर अप मार्गावरील ११०३८ गोरखपूर पुणे एक्स्प्रेस, ११०६६ पवन एक्स्प्रेस, १२१३८ पंजाब मेल, १२१५० पटना पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, १५०१८ काशी एक्स्प्रेस, २२११२ नागपूर भुसावळ व्हाया इटारसी इंटरसिटी एक्स्प्रेस, ५११५८ इटारसी पॅसेंजर आणि १५२६७ रॅक्सल - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या आठ अशा एकूण २१ गाड्या शनिवारी धावणार नाहीत. दरम्यान, कटनी पॅसेंजर खंडव्यापर्यंत सोडण्यात येणार असल्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने यापूर्वीच घेतला आहे. गाड्या रद्द हाेण्याचे सत्र सातत्याने सुरूच असल्याने प्रवासी वैतागले अाहेत. गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.